Pune Crime News | पोलिसाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याच्याराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसच जर महिलांवर अत्याचार करत असतील तर दाद मागायची तरी कोणाकडे असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे पोलीस दलात (Pune Police) पोलीस नाईक या पदावर कार्यरत असणाऱ्या एकाने अल्पवयीन मुलीला घरी बोलावून घेत तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत लोहगाव येथे राहणाऱ्या 17 वर्षाच्या मुलीने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस नाईक केशव इरतकर (Police Naik Keshav Iratkar) याच्यावर आयपीसी 354ड/2, पोक्सो कलम 11/12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.10) बी.एम.सी.सी रोडवरील एका इन्स्टिट्युच्या आवारात सकाळी साडे दहा ते साडे बाराच्या दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केशव इरतकर हे विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambag Police Station)
पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये पीडित मुलीसोबत सेल्फी काढून तिच्यासोबत
ओळख वाढवली. तिचा मोबाईल क्रमांक घेतला. शनिवारी सकाळी मुलीला घरी भेटायला बोलावून घेतले.
त्यानंतर तिच्यासोबत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पीडित मुलीने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी केशव इरतकर याच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून अद्याप त्याला अटक केलेली नाही. पुढील तपास डेक्कन पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या भावाला नेपाळ बॉर्डरवरून अटक; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Pune PMC News | घरातील खराब गाद्या, उश्या, फर्निचर, ई- कचरा टाकायची चिंता सोडा ! महापालिका 14 ऑक्टोबरपासून हा कचरा गोळा करण्यासाठी तुमच्या भागात राबवतेय विशेष मोहीम