Pune Crime News | सात वर्षाच्या चिमुरडीवर नराधमाने केला अत्याचार; दिघी कँपमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सोसायटीच्या चिल्ड्रेन पार्कमध्ये खेळत असलेल्या एका ७ वर्षाच्या चिमुरडीला बाजूला नेऊन सोसायटीतीलच एका नराधमाने अत्याचार (Crime Against Woman) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police) या नराधमाला अटक केली आहे. ही घटना दिघी कॅम्पमधील एका सोसायटीत शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी कॅम्पमधील एका सोसायटीतील फिर्यादी महिला यांची ७ वर्षाची मुलगी सोसायटीतील चिल्ड्रेन पार्कमध्ये (Children’s Park) खेळत होती. आरोपी हा कुक म्हणून कामाला असून तेथेच राहतो. त्याने या मुलीला सोबत चल असे म्हणून मंदिराच्या बाजूला घेऊन गेला. तिच्यावर बलात्कार (Pune Minor Girl Rape Case) केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | A seven-year-old girl was brutally assaulted; Incidents in Dighi Camp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा