Pune Crime News | पुणे : छातीत बुक्की मारल्याने रिक्षाचालकाचा जागीच मृत्यु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | रिक्षा रस्त्यावर लावल्याने रस्ता ओलांडण्यास जागा नसल्यामुळे टेम्पोचालकांबरोबर भांडणे झाली. त्यात टेम्पोचालकाने छातीत बुक्की मारल्याने एका रिक्षाचालकाचा जागीच मृत्यु झाला. (Pune Crime News)

 

जैनुद्दीन मोहम्मद नदाफ (वय ४८, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे मृत्यु पावलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police) खूनाचा गुन्हा (Murder In Pune) दाखल करुन टेम्पोचालक अमोल नारायण सूर्यवंशी Amol Narayan Suryavanshi (वय २७, रा. वाघोली) याला अटक केली आहे.

 

याबाबत बशीर मोहम्मद नदाफ (वय ३६, रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १७६/२३) दिली आहे. ही घटना आपले घर सोसायटीजवळील एस कुमार प्रोमचा चहा समोर सार्वजनिक रोडवर शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजता घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ जैनुद्दीन नदाफ हा रिक्षाचालक असून तो त्यांचा मित्र मतीन बागवान व पुतण्या सुलतान नदाफ हे रिक्षा कडेला लावून रिक्षामध्ये गप्पा मारत बसलेले होते.
त्यावेळी विरुद्ध बाजूने आलेल्या टेम्पोला रस्ता क्रॉस करुन जाण्यास जागा नसल्याने त्यांच्यात वाद झाला.
यावेळी टेम्पोचालक अमोल सूर्यवंशी याने शिवीगाळ करुन जैनुद्दीन याच्या छातीत जोरात बुक्की मारली.
त्यामुळे जैनुद्दीन हा कळवळला आणि जागीच कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेले.
परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु झाला. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन टेम्पोचालक सूर्यवंशी याला अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Pune: A rickshaw puller died on the spot after being punched in the chest

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | मोक्काच्या गुन्ह्यात दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

CNG-PNG Rates Reduces | पुणेकरांना दिलासा! सीएनजी 6 रुपयांनी तर पीएनजीच्या किंमती 5.70 रुपयांनी स्वस्त

Maharashtra Politics News | ‘या माणसाने महाराष्ट्राच्या राजकारणात दुहीचं बीज पेरलं’, चंद्रकांत पाटलांचा निशाणा कोणावर?