Pune Crime News | पुण्यातील सहकारनगरमध्ये झाड रिक्षावर कोसळून दत्तनगर-आंबेगाव परिसरातील एका महिलेचा मृत्यू; 3 महिलांसह लहान मुलाला स्थानिकांनी सुखरूप काढले बाहेर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्याच्या सहकारनगर (Sahakar Nagar) परिसरामध्ये झाड रिक्षावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर रिक्षा चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. अग्नीशमन दलाच्या (Pune Fire Brigade) जवानांनी रिक्षातील इतर 3 महिलांना आणि एका मुलाला तात्काळ बाहेर काढले आहे. (Pune Crime News)

 

दिनांक १२•०६•२०२३ रोजी दुपारी ०४•५४ वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात सहकार नगर, मुक्तांगण शाळेजवळ रिक्षावर झाड पडून महिला जखमी अवस्थेत असल्याची वर्दि मिळताच जनता अग्निशमन केंद्र व मुख्यालयातून एक रेस्क्यू व्हॅन रवाना करण्यात आली होती. (Pune Crime News)

 

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, मुक्तांगण शाळेजवळील बसस्थानकामागे तार कंपाउंडमधे असलेले एक मोठे झाड रिक्षावर पडून आतमधे एक महिला गंभीर स्वरुपात जखमी अवस्थेत अडकली आहे. रिक्षामधे एकुण चार महिला व एक लहान मुलगा प्रवास करत होते. त्यापैंकी तीन महिला व लहान मुलगा (वय वर्ष तीन) यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने बाहेर काढले होते. तसेच रिक्षाचालक किरकोळ स्वरूपात जखमी होता. दलाच्या जवानांनी सदर गंभीर जखमी असलेल्या महिलेची सुटका करुन शासकीय रुग्णवाहिका क्रमांक १०८ यामधून रुग्णालयात रवाना केले. या घटनेत रिक्षाचे व एका टपरीचे ही नुकसान झाले आहे. दलाचे जवानांनी सॉ, घन, पहार, रश्शी अशा विविध अग्निशमन साहित्याचा वापर केला.

सदर कामगिरीत अग्निशमन अधिकारी रविंद्र आढाव, प्रशांत गायकर व वाहनचालक सागर देवकुळे, अक्षय राऊत तसेच तांडेल संदिप घडशी
आणि फायरमन महेंद्र सकपाळ, शैलेश गोरे, चंद्रकांत आनंदास, भुषण सोनावणे, अक्षय शिंदे, हेमंत शिंदे, गणेश मोरे यांनी सहभाग घेतला.

मयत महिला लीला विश्वनाथ काकडे – वय अंदाजे ५० , राहणार दत्तनगर आंबेगाव, जांभुळवाडी (ससून रुग्णालय)

इतर प्रवासी – नम्रता सचिन पोळ – वय ४६, कमल अडिकामे – वय ६९, मीना पुरुषोत्तम पोळ – वय ६१

लहान मुलाचे व रिक्षाचालकाचे नाव समजू शकले नाही.

 

Web Title :  Pune Crime News | A woman from Dattanagar-Ambegaon area died after a tree fell on a
rickshaw in Sahakarnagar in Pune; 3 women and a child were safely pulled out by the locals

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा