NCP MP Supriya Sule | ’20 तारखेला गुवाहाटीला जाण्याचे तिकीट दिले, तर…’, सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर मिश्किल टीका

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati Lok Sabha Constituency) खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) या गावभेट उपक्रमाअंतर्गत मतदारसंघातील गावांना भेटी देत आहेत. आज इंदापूर तालुक्यातील न्हावी या गावी भेट देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Govt) मिश्किल टोलेबाजी केली. राज्यातील गद्दार सरकारची अ‍ॅनिवर्सरी (Anniversary) आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी 20 तारखेला गुवाहाटीला जाण्याचे तिकीट दिले, तर सांभाळून रहा, अशी टीका त्यांनी केली. तसेच मतदारसंघातील लोकांना सावध राहण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा  

https://twitter.com/supriya_sule/status/1668218029946331137?s=20

सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) म्हणाल्या, रॅडिसन हॉटेलमध्ये (Radisson Blu Hotel Guwahati) राहण्याचे निमंत्रण दिलं तर सांभाळून रहा, विचार करा, गद्दारांना खासगी हॉटेल लागले, प्रायव्हेट विमानसुद्धा लागले. गद्दारी करताना कोणालाही, असे वाटले नाही की आपल्या मतदारसंघातील लोकांमध्ये जाऊन त्यांना विचारावे. गावभेटी घ्याव्यात, लोकांना सांगावे हा मी निर्णय घेत आहे. तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहणार का? असे एकानेही विचारलं नाही. तुम्ही पक्ष बदलता, विचारधारा बदलता, सरकार पाडता. लोकांना विश्वासात घ्यावे असे का वाटले नाही? तिकडे गुवाहाटीमध्ये एकमेकांना मिठ्या मारता, शॉर्ट कपडे घालता, तुम्ही सुट्टीला गेले होते की देशाच्या सेवेसाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या सरकारने गद्दारी केली

काल एक बातमी ऐकली की, भाजपने (BJP) शिंदे गटाला (Shinde Group) सांगितले आहे की तुमचे पाच मंत्री
काढून टाका. मी विचार करत आहे की काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी अनेक वर्षापासून सत्तेत होती.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांना सांगू शकत नाही की कोणी कोणाला मंत्री करायचे.
काँग्रेसने त्यांचे मंत्री करायचे आणि बाकी पक्षांनी त्यांचे मंत्री करायचे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणायचे की हे मिंधे सरकार आहे. ते आता मला पटू लागले आहे.
या सरकारने गद्दारी केली यात काही वाद नाही. बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) पक्ष स्थापन केला.
ते हयात असताना हा पक्ष उद्धव ठाकरेंना दिला. त्यामुळे तो पक्ष कोणाला घेण्याचा अधिकार नाही,
असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

Web Title :   NCP MP Supriya Sule | Baramati NCP MP supriya sule statement on shinde fadanvis government first anniversary

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS MLA Raju Patil | ‘ही तर भाजप शिंदे गटाची खेळी’, कल्याण लोकसभा जागेच्या वादावरुन मनसेने काढला चिमटा; म्हणाले – ‘ही मंडळी पुन्हा…’

Maharashtra Politics News | वसुलीबाज कृषीमंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; काँग्रेसची मागणी

Hruta Durgule | अभिनेत्री ऋता दुर्गुळे पडली होती सहकलाकाराच्या प्रेमात; मुलाखतीमध्ये केले कबुल