Chitra Wagh | चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटलांची तुलना महात्मा फुलेंसोबत, म्हणाल्या-‘घरोघरी सावित्री दिसतात, मात्र, चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी भाजप नते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची तुलना थेट महात्मा फुले (Mahatma Phule) यांच्यासोबत केली आहे. घरोघरी सावित्री दिसतात, मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या जोतिबांचा शोध सुरु आहे, असं चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी म्हटलं आहे. भाजपतर्फे मकरसंक्रांती निमित्त ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होता.

 

यावेळी कार्य़क्रमाला चंद्रकांत पाटील आणि चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा फुले यांच्याशी केली आहे.

 

चित्रा वाघ म्हणाल्या, महिलांच्या जेवढ्या चळवळी झाल्या त्या सर्व चळवळींच महत्वाचं केंद्र पुणे आहे. आजचीही नवीन सुरुवात येथून झाली आहे. आजच्या कार्यक्रमात देखील एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळं. चंद्रकांत पाटील हे नेहमीच परिवर्तन घडवत असतात. आज देखील त्यांच्या माध्यमातून नवीन पायंडा पडला आहे. त्यामुळेच मी नेहमी म्हणते, आम्हाला सावित्रीबाई (Savitribai Phule) घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील आणि हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या सारख्या ज्योतिबांचा शोध जारी आहे. असे जोतिबा समाजात जास्तीत जास्त तयार व्हाव्हेत याच आजच्या दिवसानिमित्त मी शुभेच्छा देईन असं चित्रा वाघ म्हणाल्या.

माझा विरोध विकृतीला होता
यावेळी उर्फी जावेदच्या (Urfi Javed) कपड्यांवर देखील त्यांनी भाष्य केलं.
त्या म्हणाल्या, माझा विरोध कोणत्याही महिलेला किंवा तिच्या धर्माला नव्हता. माझा विरोध हा विकृतीला होता.
परंतु आता कौतुक केलं पाहिजे, कारण ती महिला आता पूर्ण कपड्यांमध्ये दिसत आहे.
कोण सुधारत असेल तर त्याचं कौतुक पण केलं पाहिजे. तिने काही ठरवलं असेल.
कारण ती आता चांगल्या कपड्यांमध्ये दिसत आहे. अलीकडील काळात मला अनेकजण फोटो पाठवत आहेत.
त्यामध्ये ती चांगले कपडे घालताना दिसत आहे.

 

Web Title :- Chitra Wagh | Chitra Wagh compared Chandrakant Patal with Mahatma Phule, said- ‘Savitri is seen in every household, but like Chandrakant Patil…’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या संत तुकाराम महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या…

Dhirendra Krishna Shastri | संत तुकाराम महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर देहू संस्थान विश्वस्तांची नरमाईची भूमिका?; म्हणाले…

Lingayat Samaj Protest | मुंबईतील लिंगायत समाजाचा मोर्चा स्थगित, 70 ते 80 टक्के मागण्या पूर्ण

Australian Open | जोकोविचने 22 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावून राफेल नादालच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी