Pune Crime News | ‘लफडेबाज’ पत्नी ‘अंजली’चा पती ‘नितीन’ने केला भररस्त्यात गळा चिरून खून; हडपसर परिसरातील बंटर स्कूलच्या पाठीमागे घडलेली घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीच्या बाहेरख्याली पणाला कंटाळून भररस्त्यात पत्नीचा चाकूने गळा चिरून खून (Murder) केल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. कांदा कापण्याच्या सुरीने त्याने तिचा गळा चिरला अन स्वतः आत्महत्या (Suicide) करण्यास गेला. पण, त्याच्या भावाने त्याला समजावून सांगत हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) बोलावून घेतले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. Pune Crime News Anjali s husband Nitin commits murder by slitting his throat The incident took place behind the Bunter School in Hadapsar area

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

अंजली नितीन निकम (Anjali Nitin Nikam) (वय 22, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती नितीन निकम (Nitin Nikam) (वय 27 रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, मूळ गाव दहिगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला हडपसर पोलिसांनी (Hadapsar police) अटक केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली आणि नितीन यांचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना 4 वर्षांचा मुलगा आहे. नितीन भोसरीतील फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिशियनचे काम करतो. तर पत्नी अंजली गृहिणी होती. पण, तिची वागणूक चांगली नव्हती. तिचे बाहेर अनैतिक संबंध होते. त्याचा त्रास पती नितीन याला होत होता. तो तिला समजावून सांगत होता. पण, ती ऐकतच नव्हती. तिचा बाहेरख्यालीपाणी सुरूच होता.

दरम्यान, ती हडपसर भागात राहत असलेल्या आईकडे आली होती.
तर नितीन याचा भाऊ आजारी असल्याने तो पुण्यात उपचारासाठी आला होता.
त्याच्यावर उपचार झाल्यानंतर आज त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळाली होती.
यावेळी नितीन पत्नी अंजली हिला घेऊन जाण्यासाठी म्हणून आईकडे आला.
त्याने तिला घरी नेण्यासाठी प्रयत्न केले. पण, ती येत नव्हती. तसेच त्याला मला रहायचं नाही.
मला मुलगा देखील नको, असे म्हणत होती. यावेळी नितीनने तिला आपल्याला मुलाला मोठ्या भावाबरोबर गावाकडे पाठवायचे आहे.
पण तो भावासोबत जात नाही. आपण त्याला सोडून येऊ असे म्हणून बाहेर आणले.
दुचाकीवर ते जात असताना बंटर स्कूलच्या पाठीमागे दुचाकी उभी करून लघुशंका करतो असे सांगून नितीन बाजूला गेला.
तिला दुचाकी धरण्यास सांगितले. तिने दुचाकी धरल्यानंतर नितीनने पाठीमागून जाऊन तिचा चाकूने गळा चिरून खून केला.

त्यानंतर तो तेथून आत्महत्या करण्यासाठी गेला.
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने भावाला फोन केला. तसेच मी पत्नीचा खून केला आहे.
माझ्या मुलाला सांभाळ असे सांगितले.
त्यावेळी भावाने त्याची समजूत काढली व आत्महत्या करण्यापासून रोखले.
तर त्याला पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. मग तो पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीचा खून केल्याची माहिती दिली.
त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

Web Title : Pune Crime News Anjali s husband Nitin commits murder by slitting his throat The incident took place behind the Bunter School in Hadapsar area

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Vinayak Raut | ‘नारायण राणेंना पंतप्रधान केले, तरी शिवसेनेला दु:ख वाटण्याचे कारण नाही’

Social and Political Agitation Cases | सामाजिक, राजकीय आंदोलनातील डिसेंबर 2019 पुर्वेचे खटले मागे घेण्याचा सरकारचा निर्णय, समिती स्थापन