Pune Crime News | खुर्चीवर बसण्यावरुन दोघांमध्ये वाद, एकाच्या डोक्यात घातला दगड; कर्वेनगरमधील घटना

0
609
Pune Crime News | Argument between two over sitting on a chair, stone thrown on one's head; Incident in Karvenagar
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | खुर्चीवर बसण्याच्या कारणावरुन दोन कामगारांमध्ये बाचाबाची झाली. याचे रुपांतर हाणामारीत होऊन एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले. हा प्रकार कर्वेनगर (Karvenagar) येथील एका बांधकाम साईटवर (Construction Site) रविवारी (दि.29) दुपारी साडेचारच्या सुमारास घडला. याप्रकरणी (Pune Crime News) एकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

महेश लक्ष्मण आटोळे Mahesh Laxman Atole (वय-28 रा. हॅप्पी कॉलनी, गोसावी वस्ती, कोथरुड) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) सोमवारी (दि.30) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी योगेश विजय पवार Yogesh Vijay Pawar (रा. कर्वेनगर, पुणे) याच्यावर आयपीसी 324, 323, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी हे गोसावी वस्ती लेन नं. 1 कोथरुड कर्वेनगर येथील बांधकाम साईटवर कामाला आहेत. रविवारी दुपारी खुर्चीवर बसण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाले. याचा राग मनात धरुन आरोपीने फिर्यादी हे बेसावध असताना दगड डोक्यात मारुन जखमी केले.
तसेच शिविगाळ केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Argument between two over sitting on a chair,
stone thrown on one’s head; Incident in Karvenagar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा