Pune Crime News | बीट मार्शलवर सपासप वार करुन फरार झालेल्या आरोपीला बंडगार्डन पोलिसांक़डून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Vimantal police station) हद्दीत रात्री उशीरापर्यंत सुरु असलेले चायनिज सेंटर बंद केल्याच्या रागातून एकाने बीट मार्शल वर चाकूने वार (Stabbing Beat Marshall) केल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. महानंदेश्वर उर्फ मल्ल्या महादेव बताले (वय 24 रा. नळदुर्ग, जि. उस्मानाबाद) असे अटक (Pune Crime News) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस नाईक सचिन उत्तम जगदाळे (Sachin Uttam Jagdale) असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी महानंदेश्वर उर्फ मल्ल्या महादेव बताले याच्यावर आयपीसी 353, 333, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (दि.14) रात्री सव्वा अकराच्या सुमारास समायरा चायनिज सेंटर, धानोरी जकात नाका, लोहगाव येथे घडली. (Pune Crime News)

विमातळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी पुणे स्टेशन (Pune Station) परिसरात येणार असल्याची माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्यातील (Bund Garden Police Station) पोलीस अंमलदार यांना समजली. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी विमानतळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil), सहाय्यक पोलीस आयुक्त आर.एन. राजे (ACP R.N. Raje),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (Senior Police Inspector Pratap Mankar),
पोलीस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी सातपुते (Inspector of Police Ashwini Satpute) यांचे
मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रवींद्र गावडे (Ravindra Gawde) पोलीस अंमलदार अमोल सरडे,
राजू धुलगुडे, विलास केकान, शंकर संपते, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, संजय वनवे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title :- Pune Crime News | Bandgaardan police arrested the accused who absconded after stabbing beat marshal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | राज्यातील पाचही विधानपरिषदेच्या मतदारसंघाच्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट, नाशिकमध्ये तिरंगी लढत; जाणून घ्या पाच ठिकाणी कशी होणार लढत?

Nashik Graduate Constituency Election | नॉट रिचेबल असलेल्या शुभांगी पाटील माध्यमांसमोर येताच म्हणाल्या…

Kirit Somaiya | हसन मुश्रीफ यांच्याबाबतची ‘ती’ भूमिका चंद्रकांतदादा पाटील यांनीच स्पष्ट करावी – किरीट सोमय्या