Pune Crime News | पुण्यातील मुठा नदीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह, परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरातील मुठा नदीमध्ये (Mutha River) एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर परिसरातील दगडी पुलाखाली हा मृतदेह आढळून (Unidentified Dead Body) आला असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर (Shivajinagar) परिसरातील दगडी पुलाखाली आज (गुरुवार) सकाळी साडे दहाच्या सुमारास एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे नागरिकांना दिसले. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढाला आहे. मृतदेह पुरुष व्यक्तीचा असून त्याचे अंदाजे वय 55-60 च्या आसपास आहे.

मृत व्यक्तीच्या डोक्याला मार लागलेला असून गुडघ्याला देखील जखमा झाल्या आहेत. या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून हा खून (Murder) आहे की आत्महत्या (Suicide) याचा तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Governor Nominated MLC | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला ठरला; भाजपबरोबरच शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादीलाही संधी

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कौतुक; म्हणाले, “अजित पवार प्रामाणिक…”

Pune Crime News | कोथरूडमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांना पुण्यात आश्रय देणाऱ्यास ATS कडून अटक

Pune Crime News | वारजे माळवाडीमध्ये सेंट्रिंग काम करताना इमारतीवरुन पडून कामगाराचा मृत्यु; कन्स्ट्रक्शन मालक व ठेकेदारावर गुन्हा दाखल

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा 14 वा हप्ता आज मिळणार; राजस्थानमधून पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार वितरण

Maharashtra Rain Update | राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईसह काही भागात शाळांना सुट्टी