Pune Crime News | पुण्यात मेट्रोच्या साहित्यावर चोरट्यांचा डल्ला, कोरेगाव परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यात मेट्रोचे (Pune Metro) काम सुरु असून मेट्रो धावण्यापूर्वीच चोरट्यांनी साहित्याची चोरी केली आहे. अज्ञात चोरट्यांनी मेट्रोचे दीड लाखांचे साहित्य चोरुन (Stolen) नेले. याबाबत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही घटना (Pune Crime News) बंडगार्डन मेट्रो स्टेशन परिसरात घडली आहे.

बंडगार्डन मेट्रो स्टेशन (Bund Garden Metro Station) परिसरात रस्त्याच्या कडेला एक लोखंडी कंटेनर होता.
या कंटेनरमधून अज्ञात चोरट्याने एक लाख 42 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरुन नेले.
याबाबत अगमपाल सुरजित सिंग धूपर यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन मेट्रो स्टेशन येथे रस्त्याच्या केडेला मेट्रोचे साहित्य घेऊन आलेला
कंटेनर उभा करण्यात आला होता. चोरट्यांनी कंटेनरचे लोखंडी स्टोअर लॉक तोडून 10 इलेक्ट्रिक वायरचे बंडल,
एक वेल्डिंग मशीन, तांब्याचे 16 लाइटनिंग अरेस्टर, दोन बटरफ्लाय, कटर मशीन, ड्रिल मशीन चोरुन नेले.
पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | bund garden metro station iron tools theft in pune koregaon park police station crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Davos World Economic Forum 2023 | दावोस जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार; एक लाखांहून अधिक रोजगार निर्मिती

Pune District Planning Committee | पुणे जिल्हा नियोजन समितीवर सदस्य नियुक्त; 20 जणांचा समावेश

Sanjay Raut | ‘फडणवीस बदला घेतात की नाही, हे मी सांगू शकत नाही,’ संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सूचक विधान

Nashik Crime | नाशिक पुन्हा हादरलं! जुन्या भांडणातून तरुणाचा निर्घृण खून, 24 तासात दोन घटना