Pune Crime News | डेटिंग अ‍ॅपवरुन तरुणांना लुटणाऱ्या ‘बंटी-बबली’ला गुन्हे शाखेकडून अटक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | डेटिंग अ‍ॅपवर (Dating Apps Pune) तरुणांशी ओळख केल्यानंतर त्यांना मुलींचे फोटो पाठवून हॉटेलमध्ये रुम बुक करण्यास सांगून त्यांना लुटणाऱ्या परप्रांतिय महिलेला व एका पुरुषाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell Pune) अटक केली आहे. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आले असून 50 लाख 69 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Crime News)

आरोपींनी डेटिंग अ‍ॅपद्वारे ग्राहकांना आकर्षित करून त्यांना हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावून घेऊन त्यांच्याकडून ठरलेली रक्कम घेत होते. त्यानंतर ग्राहकाला दमदाटी व मारहाण करुन आणखी जास्तीची रक्कम ऑनलाईन घेऊन ग्राहकाकडील मौल्यवान वस्तू, दागिने जबरदस्तीने चोरून लुटत होते. अशा प्रकारे पुण्यातील नागरिकांना आरोपींनी लुटले होते. याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष व सामाजिक सुरक्षा विभगाकडून तपास सुरु असताना आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात चार गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये पुण्यातील विमानतळ, सिंहगड रोड, हिंजवडी आणि पनवेल येथील गुन्ह्यांचा समावेश आहे. (Pune Crime News)

आरोपींनी पुणे शहरासह महाराष्ट्र, हैदराबाद, बँगलोर या राज्यातील लोकांना सीकींग अ‍ॅडव्हेंचर या डेटिंग अ‍ॅपद्वारे फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 50 लाख 69 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भरत जाधव
(Sr PI Bharat Jadhav), सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे (API Aniket Pote),
सहायक पोलीस फौजदार राजेंद्र कुमावत, पोलीस अंमलदार सागर केकाण, अमेय रसाळ, बाबा कर्पे, तुषार भिवरकर,
हणमंत कांबळे, इरफान पठाण, इम्रान नदाफ, किशोर भुजबळ, संदीप कोळगे, महिला पोलिस अंमलदार मनिषा पुकाळे
यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC On Dengue Outbreak | डेंग्यूच्या साथीचा पावसाळ्याचा ‘पिक पिरियड’ संपल्यानंतर महापालिकेची औषध फवारणीची निविदा प्रक्रिया

Pune Crime News | पुणे हादरले! घरी सोडण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांना अटक

Illegal Hoardings In Pune | पुणे शहरातील होर्डिंगचे होणार ऑडिट, अनधिकृत होर्डिंगकडून मागील वर्षाची वसुली केली जाणार