Pune Crime News | घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्यांना मुंढवा पोलिसांकडून अटक, 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरात वाहन चोरी व घरफोडी करणाऱ्यांना मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police Station) ताब्यात घेऊन 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडून 14 दुचाकी, सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम जप्त करुन 12 गुन्हे उघडकीस आणले आहेत. गोरख विलास धांडे Gorakh Vilas Dhande (वय-20 रा. गोकूळ नगर, कात्रज) याला अटक केली आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News )

मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरी गुन्ह्याचा तपास अधिकारी व कर्मचारी करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे व सचिन पाटील यांना दोन मुले संशयीत रित्या अपराध करण्याच्या इराद्याने चोरीची दुचाकी घेऊन घोरपडी गाव येथील साज कंपनीजवळ फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले. (Pune Crime News)

ताब्यात घेतलेल्या दोघांकडे दुचाकीबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आरोपींनी दुचाकी चोरीची असल्याचे कबुल केले. आरोपींकडून मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेला वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपींकडे अधिक चौकशी करुन त्यांच्याकडून 14 दुचाकी जप्त केल्या. तसेच कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यातील सोने-चांदी व रोख रक्कम जप्त केला. पोलिसांनी या कारवाईत एकूण सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जप्त केलेल्या 14 दुचाकीपैकी 11 दुचाकीबबात पुणे शहर व परिसरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर इतर तीन वाहनांबाबत पोलीस तपास करीत आहेत. आरोपी गोरख धांडे यांच्यावर घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून मुंढवा, कोंढवा, हडपसर, वानवडी, सिंहगड रोड, पुणे ग्रामीण मधील राजगड, लोणावळा, सासवड पोलीस ठाण्यातील 12 गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ -5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Senior PI Vishnu Tamhane),
पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदिप काकडे (PI Pradeep Kakade),
तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप जोरे (API Sandeep Jore),
पोलिस अंमलदार दिनेश राणे, दिनेश भांदुर्गे, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे, सचिन पाटील, स्वप्नील रासकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे खून प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, कारण आलं समोर

पुणे पोलिसांकडून पावणे पाच कोटींचा अमली पदार्थांचा साठा नष्ट

खरेदी केलेली अ‍ॅम्ब्युलन्स नावावर करुन न देता कंपनीची फसवणूक, खेड येथील घटना