Pune Crime News | ‘कपिल शर्मा’च्या नावाने 10 वेळा फोन, अश्लील बोलून महिलेचा विनयभंग; कल्याणीनगर मधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime News | पुण्यातील महिलेच्या फोनवर वारंवार फोन करुन तिला कपिल शर्मा (Kapil Sharma) बोलत असल्याचे सांगून तिच्यासोबत अश्लील बोलून विनयभंग (Molestation) केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तसेच या महिलेच्या पतीने याबाबत जाब विचारला असता महिलेबाबत अश्लील टिप्पणी केली. हा प्रकार बुधवारी (दि.22) पावणे बारा ते एकच्या दरम्यान महिला काम करत असलेल्या कल्याणीनगर (Kalyaninagar) येथील कार्यालयात घडला. (Pune Crime News)

याप्रकरणी कपिल शर्मा नाव सांगणाऱ्या 8757709246 या मोबाईल धारकावर आयपीसी 354, 354अ, 354ड, 504, 509 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत घोरपडी येथे राहणाऱ्या 27 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) गुरुवारी (दि.23) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कल्याणीनगर येथील कार्यालयात काम करत होत्या. त्यावेळी आरोपीने महिलेला तिच्या मोबाईलवर तब्बल 10 वेळा फोन केला. ‘मै कपिल शर्मा बात कर रहा हूँ, पहचाना नही क्या? उस दिन तो नाईट को ओयो हॉटेल में मिले थे, दीपक है क्या?’ असे बोलून तिचा विनयभंग केला.

यानंतर महिलेने याबाबत पतीला सांगितले. तिच्या पतीने आरोपीला फोन करुन याचा जाब विचारला.
त्यावेळी आरोपीने ‘तेरी वाईफ ओयो मे जाती है, गलत काम करती है, उसको देखो’ असे बोलून त्यांना देखील अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गायकवाड (PSI Gaikwad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना कोंढवा पोलिसांकडून अटक

पुण्यातील धक्कादायक प्रकार, UPSC करणाऱ्या तरुणीचा शिक्षकाकडून विनयभंग

FIR On Dr Ashish Bharti | अ‍ॅटिजेन टेस्टिंग किट घोटाळा : पुणे महापालिकेच्या तत्कालीन आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारतीसह दोघांवर गुन्हा दाखल

Pune PMC News | ‘माननीया’च्या आशिर्वादाने अभियंत्याला दोन मलईदार खात्यांची ‘जहागीरी’ ! अभियंत्याच्या ‘कतृत्वाने’ दोन्ही खात्यातील अधिकार्‍यांची डोकेदुखी वाढली