Pune Crime News | नवले पुलाजवळील हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील (Mumbai Bengaluru Highway) नवले पुलाजवळील (Pune Navale Bridge ) एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर (Hookah Parlour) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक-1 ने (Anti Narcotics Cell Pune) छापा टाकला असून पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हुक्क्याचे साहित्य, सुगंधी तंबाखू आणि इतर ऐवज असा एकुण 68 हजार रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. (Pune Crime News)

 

मयूर प्रकाश माने (वय २७, रा. साई द्वारिका सोसायटी, वडगाव), प्रणीत संजय पोटपिटे (वय २३, रा. दांगट पाटील नगर, शिवणे), आदर्श अशोक गज्जर (वय ३०, रा. एनडीए रस्ता, उत्तमनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवले पुलाजवळील एका हाॅटेलच्या इमारतीतील छतावर ॲरो हाॅटेल आहे. या हाॅटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून हुक्का, सुगंधी तंबाखू, इतर साहित्य असा ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (Pune Crime News)

 

हुक्का पार्लरमधील 3 कामगारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक आयुक्त सुनील पवार (ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Sr PI Vinayak Gaikwad),
सहायक निरीक्षक शैलजा जानकर (API Shaileja Jankar) ,पोलिस अंमलदार सुजित वाडेकर, पांडुरंग पवार,
प्रविण उत्तेकर, मनोजकुमार साळुंके, मारूती पारधी, विशाल दळवी, संदिप शिर्के, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहाना शेख आणि योगेश मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Crime Branch raids hookah parlor near Navale Bridge

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nana Patole | मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर देखील नाना पटोले कसबा विधानसभा पोटनिवडणुक लढविण्यावर ठाम; म्हणाले…

Pune Bypoll Elections | कसबा आणि चिंचवड मतदारसंघासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रे निश्चित

Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास