Pune Crime News | दत्तवाडी : 8 वर्षाच्या मुलावर दोन महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या तिघांना अटक

पुणे : Pune Crime News | घराजवळ राहणार्‍या एका ८ वर्षाच्या चिमुरड्यावर गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Abuse) केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी (Pune police) तिघांना अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

संतोष ऊर्फ पक्या प्रकाश शिंदे Santosh alias Pakya Prakash Shinde (वय २१), किरण सुरेश सावंत Kiran Suresh Sawant (वय २५) आणि हेमंत ऊर्फ हेम्या महेश माळवे Hemant alias Hemya Mahesh Malve (वय १९, तिघे रा. पर्वती दर्शन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार मागील दोन महिन्यांपासून सुरु होता. याबाबत पीडित मुलाच्या वडिलांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९१/२३) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच परिसरात राहतात. संतोष शिंदे याने फिर्यादी यांच्या ८ वर्षाच्या मुलाला गुटखा आणायला सांगितले. त्याला घरी घेऊन जाऊन तेथे हेमंत माळवे व किरण सावंत होते. त्यांनी मुलाला अश्लिल व्हिडिओ दाखविला. त्यानंतर दोघांनी आळीपाळीने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याचा हेमंत याने व्हिडिओ काढला. तो तुझ्या नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन त्यांच्यावर वारंवार अत्याचार केला. (Pune Crime News)

या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास चाकू खुपसून तुला मारुन टाकीन.
त्यानंतर पेटीमध्ये टाकून लॉक करुन एका खड्ड्यात टाकीन, तुझ्या आईवडिलांनी विचारले कुठे गेला तर
आम्हाला माहिती नाही, असे सांगेन, अशी धमकी दिली होती.
त्याचा त्रास होऊ लागल्याने त्याने आपल्या आईला प्रथम हा प्रकार सांगितला.
तेव्हा हे सर्व उघड झाले असून दत्तवाडी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Dattawadi: Three arrested for unnaturally abusing an 8-year-old boy for two months

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ED Raid in Pune – Hasan Mushrif | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील ९ ठिकाणी ईडीची छापेमारी

Subhash Desai | मुलाच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुभाष देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले-‘त्याचं राजकीय अस्तित्व…’