Pune Crime News | पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा केला बनाव, लोणी काळभोर पोलिसांकडून काही तासात गुन्हा उघड; आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मोटारसायकल रेस करत असल्याच्या कारणावरुन भाडेकरूने घर मालकाचा खून (Murder In Pune) केला. त्यानंतर पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याचा बनाव रचला. मात्र, लोणी काळभोर पोलिसांनी (Pune Rural Police) तपास करुन गुन्हा उघडकीस आणून आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.20) दुपारी बारा ते दीडच्या दरम्यान उरुळी देवाची गावातील खंडोबा माळ येथे घडला आहे. (Pune Crime News)

दादा ज्ञानदेव घुले (वय-50 रा. खंडोबा माळ, उरुळी देवाची, ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर संतोष राजेंद्र धोत्रे (वय-37 रा. खंडोबा माळ, ता. हवेली) याच्यावर आयपीसी 302, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत दादा घुले यांचे पुतणे प्रथमेश संतोष घुले (वय-19 रा. घुले वस्ती, मांजरी रोड, दत्त मंदिरासमोर, मांजरी बु.) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) मंगळवारी (दि.21) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दादा घुले हे घरमालक असून फिर्यादी यांचे चुलते आहेत. धोत्रे हा घुले यांच्या चाळीत राहणारा भाडेकरु आहे. सोमवारी दुपारी ते दोघे दारु पिले. त्यानंतर संतोष धोत्रे हा झोपायला गेला. दादा घुले यांनी मोटारसायकल सुरु करुन तिचा एक्सिलेटर वाढवला. मोटारसायकल रेस करुन ठेवल्यामुळे धोत्रे याची झोपमोड झाल्याने यावरून त्यांच्यात वाद झाला. तेव्हा संतोष याने दादा घुले यांना मारहाण केली.
त्यानंतर आरोपीने घुले यांना पाण्याच्या टाकीत टाकले. त्यात दादा घुले यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. (Pune Crime News)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण (Sr PI Shashikant Chavan)
यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीसांनी गुन्ह्याचा काही तासातच छडा लावून आरोपी संतोष धोत्रे याला अटक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार (API Jitendra Khairnar) करित आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

कोर्टात पोहोचण्यास उशीर, दोन पोलिसांना गवत कापण्याची शिक्षा

गाडीतून कचऱ्याच्या पिशव्या आणून थेट समुद्रात टाकल्या, व्हिडिओ पाहिल्यावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई