Pune Crime News | कारचालकांची मुजोरी; स्वत: दिली धडक, पीएमपी चालकाला मारहाण

पुणे : Pune Crime News | पाठीमागून येऊन बसला धडक देऊन तुला नीट गाडी चालविता येत नाही का असे म्हणून कारचालकाने पीएमपी चालकाला (PMPML Driver) मारहाण (Beating) केल्याचा प्रकार मुंढवा (Mundhwa News) भागात घडला. (Pune Crime News)

याबाबत पीएमपी चालक इरबा मारुती इबीतदार Irba Maruti Ibitdar (वय ३०, रा. केसनंद रस्ता, वाघोली) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९९/२३) दिली आहे. मगरपट्टा-मुंढवा रस्त्याने पीएमपी चालक इबीतदार सकाळी सव्वा दहाच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी मुंढवा चौकात बस थांबली. पाठीमागून आलेली कार पीएमपी बसवर आदळली. त्या वेळी कारचालक बाहेर आला. तुला बस नीट चालविता येत नाही का?, अशी विचारणा करुन त्याने पीएमपी चालक इबीतदार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इबीतदार यांना मारहाण करुन कारचालक पसार झाला. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर तपास करत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Driver’s restraint; Self-inflicted hit, beating of PMPML driver

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS MLA Raju Patil | मुख्यमंत्र्यांची मनसे कार्यालयाला भेट, राजकीय चर्चेला उधाण; युतीबाबत राजू पाटलांचे सूचक विधान, म्हणाले-‘…तर एकत्र येऊ’

Sangli ACB Trap | 40 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Gold-Silver Rate Today | पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

Pune Crime News | सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या; हडपसर पोलीस ठाण्यात FIR

MP Arvind Sawant | ‘सध्या केंद्र सरकार महाष्ट्राची शोभा करतंय, त्यामुळे…’, अरविंद सावंत यांचे टीकास्त्र