Pune Crime News | पुण्यात दोन कारवायात 11 लाखांचे अमली पदार्थ जप्त; कॅथा इडुलिस खत, ड्रग्ज प्रथमच पकडले, दोन परदेशी नागरिकांना अटक

पुणे : Pune Crime News | नायजेरिया (Nigeria) पाठोपाठ आता येमन (Yemen) देशातील नागरिक अमली पदार्थ तस्करीत (Drug Trafficking) सक्रीय असल्याचे पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (Pune Police Anti Narcotics Cell) केलेल्या कारवाईत उघड झाले आहे. कॅथा इडुलिस खत (Catha Edulis Fertilizer) हा अमली पदार्थावर पुण्यात प्रथमच कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime News)

अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस नाईक विशाल शिंदे (Police Naik Vishal Shinde) यांना एक परदेशी नागरिक कोंढवा (Pune Kondhwa News) येथील रहाते घरातून अंमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड (Sr PI Vinayak Gaikwad) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण डेंगळे (API Laxman Dengle), API शैलेजा जानकर (API Shaileja Jankar) यांच्या पथकाने परफेक्ट फॉरर्च्युन सोसायटीत छापा टाकून येमन नागरिक अल-सयाघी अब्दुलेलाहा अब्दुल्ला अहमद (वय २९) याला पकडले. त्याच्याकडून ८ किलो ३९३ ग्रॅम कॅथा इडुलिस खत हा अंमली पदार्थ तसेच २ लाख ७० हजार रुपये रोख, परेदशी चलन, मोबाइल, वजन काटा असा ८ लाख ७३ हजार ५१० रुपयांचा माल जप्त केला.

कोंढवा जवळ उंड्री परिसरात नायजेरियन नागरिक कोकेन या अमली पदार्थाची विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस अमलदार पांडुरंग पवार (Police Pandurang Pawar) यांना मिळाली होती. पोलिसांनी भवानी कॉम्प्लेक्स येथे छापा टाकून फेलीस्क ऐजे एकेचुकु (वय ५२ रा. उंड्री) याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४ लाख ६३ हजारांचे २३ ग्रॅम कोकेन, मोबाइल, दुचाकी असा ५ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला. (Pune Crime News)

कॅथा इडुलिस खत पुण्यात प्रथमच कारवाई

केंद्र सरकारने (Central Government) कॅथा इडुलिस खत याचा अंमली पदार्थांमध्ये २०१८ मध्ये समावेश
केला आहे. हा अंमली पदार्थ आपल्याकडे फारसा दिसून येत नाही. विशेष म्हणजे गांजा सारखा असणारा हा पदार्थ
ओळखणे अवघड आहे. हा चहा पत्तीसारखा दिसतो. त्यामुळे पटकन ओळखायला येत नाही.
भारतात अनेक देशातून मेडिकल व्हिसावर नागरिक येत असतात. येमन नागरिकांकडून त्याची प्रामुख्याने
तस्करी केली जाते. यापूर्वी मुंबईमध्ये दोन वर्षांपूर्वी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता.

गांजाचा साधारण दर २० हजार रुपये किलो असून त्याच्या तिप्पट महाग कॅथा इडुलिस खत असून तो ७०
हजार रुपयांना विकला जातो. ओला असेल तर तो पाला चावून चघळतात. कोरडा असेल तर पाण्यात उकळून ते
पाणी पितात. त्यामुळे नशा येते. पुण्यात प्रथमच कॅथा इडुलिस खत वर कारवाई करुन जप्त करण्यात आला आहे.

Web Title :- Pune Crime News | Drugs worth 11 lakh seized in two operations in Pune; Catha Idulis Khat, drugs seized for the first time, two foreign nationals arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | शिवसेना-धनुष्यबाणाचा वाद सुरू होता तेव्हा…, राज ठाकरेंचे पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य

Abdul Sattar | जळगावमध्ये ठाकरे गट आक्रमक, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या ताफ्यावर फेकले खोके अन् कापूस