MNS Chief Raj Thackeray | शिवसेना-धनुष्यबाणाचा वाद सुरू होता तेव्हा…, राज ठाकरेंचे पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य

MNS Chief Raj Thackeray | raj thackeray ally reacts on shivsena bow arrow symbol emotional reaction
File Photo

राज ठाकरेंनी पहिल्यांदाच घरातील षडयंत्र केलं उघड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बुधवारी पाडवा मेळावा (MNS Padwa Melava) शिवाजी पार्क येथे पार पडला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधीत करताना मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी अनेक विषयांवर भाष्य करत काही व्हिडिओ आणि फोटो दाखवले. तसेच शिवसेना (Shivsena) का सोडली याबाबत सांगताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केल्यानंतर पहिल्या मिनिटालाच आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) टोला लगावला.

आदित्य ठाकरे म्हणाले होते मनसे संपलेला पक्ष आहे. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले शिवतीर्थाचा (Shivtirtha) कोपरा न कोपरा भरलेला दिसतो आहे. अनेकांनी सांगितलं होतं की हा संपलेला पक्ष आहे. जे बोलले त्यांची अवस्था काय झाली, असं म्हणत राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

 

 

त्यावेळी वेदना होत होत्या

भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी शिवसेना आणि धनुष्यबाणाबाबत (Dhanushyaban Symbol) सुरु असलेल्या वादावर भाष्य केलं. महाराष्ट्रातील दोन वर्षातील राजकीय (Maharashtra Politics) स्थिती पाहतोय, राजकारणाचा झालेला बट्ट्याबोळ आपण सगळंच पाहत आलो. हे सगळं राजकारण पाहत असताना वाईट वाटत होते. ज्यावेळी शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझं का माझं ज्यावेळी सुरु होतं त्यावेळी वेदना होत होत्या. जितकी वर्ष लहानपणापासून तो पक्ष पाहत आलो, तो पक्ष जगलो, लहान असताना माझ्या छातीवर वाघ असायचा, असं राज ठाकरे म्हणाले.

म्हणून मी बाहेर पडलो

लहानपणापासून राजकारण पाहत आलो, बाळासाहेबांसोबत अनुभवत आलो. अनेकांच्या घामातून ही संघटना उभी राहिली आहे. माझा वाद विठ्ठलाशी नाही, तर त्याच्या आजूबाजूच्या असलेल्या बडव्यांशी आहे, हे मी तेव्हा म्हणालो होतो. हीच चार टाळकी हा पक्ष खड्ड्यात घालणार, खड्ड्यात घातल्यानंतर त्याचा वाटेकरी व्हायची माझी इच्छा नाही म्हणून बाहेर पडत आहे, हे मी तेव्हा बोलत होतो, असं राज ठाकरे म्हणाले.

एकाला झेपलं नाही, दुसऱ्याला…

2006 ला मी पक्ष याच शिवतीर्थावर स्थापन केला. त्यावेळी काय झालं, कसं झालं याचा मला चिखल करायचा नव्हता. काही गोष्टी पसरवल्या गेल्या. राज ठाकरेंना शिवसेनाप्रमुख पद (Shiv Sena Chief) पाहिजे होते, हे सगळं झुट आहे. मला तसं कधी मनात आलं नाही. तो धनुष्यबाण नव्हता तर शिवधनुष्यबाण होता. बाळासाहेबांशिवाय (Balasaheb Thackeray) कोणालाही शिवधनुष्यबाण झेपणार नाही. एकाला झेपलं नाही, माहित नाही, दुसऱ्याला झेपेल की नाही माहित नाही, असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नाव न घेता लगावला.

नवीन हाजी अली बांधण्याचा प्रयत्न सुरु

राज ठाकरे यांनी यावेळी स्क्रीनवर एक व्हिडिओ दाखवला. माहिमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या समुद्रात अनधिकृत बांधकाम केलं. दोन वर्षापूर्वी या ठिकाणी काहीही नव्हतं. माहिमजवळच्या समुद्रात नवीन हाजी अली बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. दिवसाढवळ्या हे सुरु आहे. तरीही पोलीस, महापालिका यांना दिसलं नाही? हे अनधिकृत बांधकाम तोडा, अन्यथा तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करु, असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

मनसैनिकांवरील गुन्हे मागे घ्या

एकनाथ शिंदेंकडे आता शिवसेना हे नाव आलं, जो विचार बाळासाहेबांचा विचार आहे. माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे की मशिदींवरच्या भोंग्यावरच्या आंदोलनाच्या वेळी मागच्या सरकारने माझ्या 17 हजार महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल केलेत, ते गुन्हे मागे घ्या, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. तसेच तुम्ही सत्तेत आहात. मशिदींवरील भोंगे उतरवा. तुम्हाला जमणार नसेल तर आमच्या कृतीकडे दुर्लक्ष करा. आम्ही भोंगे उतरवून दाखवतो, असेही ठाकरे म्हणाले.

नारायण राणे बाहेर गेलेच नसते

नारायण राणे (Narayan Rane) हे पक्ष सोडून गेलेच नसते. त्यांच्यासोबत काय झालं ते मी तुम्हाला सांगतो, असं म्हणत राज ठाकरेंनी तेव्हाचा किस्सा सांगितला. जेव्हा नारायण राणेंनी सर्व ठरवलं तेव्हा मी त्यांना फोन केला आणि म्हटलं की नारायण राव काय करताय. म्हटलं, मी साहेबांशी बोलतो तुम्ही जाऊ नका. नारायण राणे म्हणाले, तुम्ही बोला साहेबांशी. मी लगेच बाळासाहेबांना फोन केला, मी त्यांना सांगितलं राणेंची इच्छा नाहीये, त्यांना जाऊ देऊ नका. तेव्हा बाळासाहेब म्हणाले त्यांना लगेच घरी घेऊन ये. मी विचारलं नक्की ना, तर म्हणाले हो. मी लगेच नारायण राणेंना फोन केला, म्हटलं लगेच इथे या आपल्याला साहेबांकडे जायचंय. राणे म्हणाले निघालोच. ते तिथून निघाले आणि मला पाच मिनिटांत बाळासाहेबांचा पुन्हा फोन आला. म्हणाले, अरे, त्याला नको बोलवू. त्यावेळी मला कोणीतरी मागे बोलतंय असं जाणवत होतं, ऐकू येत होतं. मग काय मी राणेंना फोन करुन सांगितलं येऊ नका. असं म्हणत राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवलं.

पक्ष सोडताना नेमकं काय घडलं?

ज्यावेळी पक्ष सोडला तेव्हा नेमकं काय घडलं होतं, तो देखील किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला.
मला सगळीकडून दाबलं जात होते. मग एक दिवस मी उद्धवकडे गेलो.
त्याला म्हटलं गाडीत बस आपल्याला बाहेर जायचं आहे. तो म्हणाला कुठे जायचंय.
मी म्हटलं चल बाहेर  जायचंय. हॉटेल ओबेरॉयला गेलो. त्याला समोर बसवलं.
मी शिवछत्रपतींची शपथ घेऊन हे सर्व सांगतोय. त्याला विचारलं बोल तुला काय हवंय,
तुला पक्षाचा प्रमुख अध्यक्ष व्हायचंय…हो, उद्या समजा सत्ता आली तर तुला मुख्यमंत्री (CM) व्हायचंय…हो,
मला फक्त सांग माझं काम काय? मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नका,
एरवी आत ठेवायचं फक्त प्रचाराला बाहेर काढायचं, मग निवडून आलेल्या लोकांची जबाबदारी सांभाळायची नाही,
पुढच्या वेळी प्रचाराला जाताना मी लोकांना काय तोंड दाखवू?

तेव्हा उद्धव म्हणाला, मला काही प्रॉब्लेम नाही. मी विचारलं ठरलं ना, नक्की ना.
तर म्हणाला नक्की आणि आम्ही घरी आलो. बाळासाहेब झोपले होते.
मी त्यांना उठवलं आणि सांगितलं की सगळा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केला.
मी सांगितलं उद्धवशी बोललो असं सर्व झालं, तर मला म्हणाले खरंच झालं, मी म्हटलं झालं, सगळं आता मिटलं.
मला बाळासाहेब म्हणाले उद्धवला बोलव. मी म्हात्रे का कोण होते, त्यांना उद्धवला बोलवण्यास सांगितले.
पाच मिनिटं कोणीच आत आलं नाही. मी बाहेर जाऊन विचारलं उद्धव कुठेय?
तर म्हणाले की ते बाहेर निघून गेले.
या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी सुरु होत्या की मी बाहेर कधी जातोय,
त्रास देऊन यांना पक्षाबाहेर कसं काढता येईल, असं म्हणत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला.

त्यावेळी वाटलंही नाही पक्ष काढेन

मी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा माझ्या मनातही नव्हतं की मी पक्ष काढेन,
बाळासाहेबांसमोर पक्ष काढायाचा, कोण साथ देणार, कोण येणार सोबत काही माहिती नाही,
अशा सगळ्या परिस्थीत जेव्हा लोक माझ्याकडे आले मला सांगायला लागले की तुम्ही महाराष्ट्र फिरा,
जेव्हा मी महाराष्ट्रात फिरलो मला प्रतिसाद मिळायला लागला त्यानंतर मी पक्ष काढण्याचा विचार केला.
अनेक गोष्टी झाल्या, राजकारणात बाहेरून,
घरातून, सगळीकडून झाल्या, अशी खंत राज ठाकरे यांनी बोलून दाखवली.

 

Web Title : MNS Chief Raj Thackeray | raj thackeray ally reacts on shivsena bow arrow symbol emotional reaction

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Abdul Sattar | जळगावमध्ये ठाकरे गट आक्रमक, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या ताफ्यावर फेकले खोके अन् कापूस

Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा; अयोध्या वॉरीयर्स, कल्याण इलेव्हन संघांची विजयी सलामी

Total
0
Shares
Related Posts
Amravati Assembly Constituency | mla sulbha khodke suspended from congress for six years for doing anti party activities she likely to join ajit pawar ncp

Amravati Assembly Constituency | पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन; आता सुलभा खोडके अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्याच्या तयारीत

Sayaji Shinde On Sushma Andhare | sushma andhare criticism on ncp ajit pawar entry and now the sayaji shinde counterattack

Sayaji Shinde On Sushma Andhare | ‘सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिला’, राष्ट्रवादीच्या प्रवेशावर सुषमा अंधारेंचा निशाणा; शिंदेंचा पलटवार; म्हणाले – ‘मी सुषमा अंधारे यांना विचारून निर्णय घेत नाही’