Pune Crime News | रोझरी एज्युकेशन ग्रुपचे विनय अरान्हा आणि विवेक अरान्हा यांच्या 98.20 कोटी रुपयांच्या 4 मालमत्तांवर ईडीची ‘टाच’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पुणे येथील (Pune) रोझरी एज्युकेशन ग्रुपचे (Rosary Education Group) विनय अरान्हा (Vinay Aranha) आणि भागीदार विवेक अरान्हा (Vivek Aranha) यांची 98.20 कोटी रुपयांच्या चार मालमत्ता अटॅच (Property Attach) केल्या आहेत. कॉसमॉस (Cosmos Bank Pune) बँकेत बनावट कागदपत्रे (Fake Documents) देऊन कर्ज घेऊन बँकेची फसवणूक (Fraud) केल्या प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. (Pune Crime News) अटॅच करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये रोझरी एज्युकेशन ग्रुपची (Rosary Education Group) जमीन आणि शाळेच्या इमारतीचा (Rosary School) समावेश आहे.

 

ईडीने सोमवारी सांगितले की, मनी लँडरिंग विरोधी कायद्यांतर्गत (PMLA) पुण्यातील रोझरी एज्युकेशन ग्रुपचे भागिदार विनय अरान्हा आणि विवेक अरान्हा यांच्या जमीन आणि शाळेच्या इमारतीसह चार मलमत्ता अटॅच केल्या आहेत. पुण्यातील सहकारी बँकेच्या कथित बँक कर्ज फसवणुकीच्या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. PMLA च्या तरतुदींनुसार चार मालमत्ता अटॅच करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे. (Pune Crime News)

 

ईडीने अटॅच केलेल्या मालमत्तांचे बाजार मूल्य तब्बल 98.20 कोटी रुपये इतके आहे. विनय अरान्हा यांना 10 मार्च रोजी अटक (Arrest) करण्यात आली. यानंतर, त्याला मुंबईतील शहर दिवाणी व सत्र न्यायालयाच्या (Mumbai City and District Court) अतिरिक्त सत्र न्यायाधीशांसमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याची 20 मार्चपर्यंत ईडीकडे कोठडी सुनावली आहे. विनय विवेक अरान्हा याच्यावर बँकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी कॉसमॉस बँकेचे शिवाजी विठ्ठल काळे (Shivaji Vitthal Kale) यांनी पुण्यात विनय अरान्हा आणि विवेक अँथनी अरान्हा यांच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. यामध्ये आरोपींनी मालमत्तेची बनावट कागदपत्रे दाखवून कॉसमॉस बँकेकडून 2013-14 मध्ये 20.44 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे. विवेक अऱ्हाना आणि विनय अरान्हा यांच्यावर मनी लाँड्रिंगचा (Money Laundering) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी काळे यांनी दिल्ल्या तक्रारीच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे.

 

ईडीच्या तपासात उघड झाले आहे, की विनय अरान्हा यांनी रोझरी एज्युकेशन सोसायटीच्या शाळांच्या नूतनीकरण आणि पुनर्विकासासाठी कर्ज घेतले होते.
मात्र, हा पैसा शाळांसाठी वापरण्याऐवजी, त्याने आपल्या मित्र आणि सहकाऱ्यांसह मेसर्स पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर,
शब्बीर पाटणवाला, अश्विन कामत आणि मेसर्स दीप्ती एंटरप्रायझेस यांना हस्तांतरित केले.

 

ईडीने तपास केला असता विनय अरान्हा यांनी ज्यांना पैसे दिले होते त्यांनी ते पैसे शाळेसाठी खर्च केलेले नाहीत.
तसेच विनय अरान्हा याला 34 कोटी रुपये रोख स्वरुपात परत घेतल्याचे चौकशीत समोर आले.
विनय अरान्हा यांना वारंवार संधी देऊनही त्यांनी रोख रक्कमेच्या वापराचा हिशोब दिलेला नाही.
तसेच शाळेमध्ये त्यांनी 2012 पासून उत्पन्नाचा व खर्चाचा हिशोब ठेवला नाही. तसेच आयकर भरला नाही.
विनय अरान्हा तपासात सहकार्य करत नसल्याने समन्स बजावण्यात आले होते.
त्यानंतर त्याला 10 मार्च रोजी अटक करण्यात आली असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Crime News | ED attaches 4 properties worth Rs 98.20 crore belonging to Vinay Aranha and Vivek Aranha of Rosary Education Group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Osho Sambodhi Divas | ओशो संबोधी दिनानिमित्त ओशो शिष्यांची संगीत ध्यानधारणा

Pune Metro News | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! मेट्रो एप्रिलपासून गरवारे ते रुबी हॉल धावणार

Pune News | पुण्यात माणुसकीचे दर्शन ! 32 वर्षानंतर घडवून आणली आई आणि मुलांची भेट