Pune Crime News | नामांकित शैक्षणिक संस्थेत कोट्यावधींचा अपहार व आर्थिक फसवणूक, गुन्हे शाखेकडून डॉक्टरला कोल्हापूर येथून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सातारा येथील शैक्षणिक संस्थेची यापूर्वीच विक्री झाली असताना, पुण्यातील अरणेश्वर येथे राहणाऱ्या फिर्यादी यांना 2021-22 दरम्यान ही संस्था विकत द्यायची आहे सांगून विश्वास संपादन करुन 70 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. तसेच आरोपीने संस्थेचा ताबा आपल्याकडेच असल्याचे भासवून खोटी कागदपत्रे तयार करुन कोणताही परतावा न देता कोट्यवधींची फसवणूक केली. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने एका डॉक्टरला कोल्हापूर येथून अटक केली आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी फिर्यादी यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) 20 जुलै 2023 रोजी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी डॉ. संजोग महादेव देशमुख Dr Sanjog Mahadev Deshmukh (वय-28 रा. शिवाजी पार्क, कोल्हापूर मुळ रा. शिंदेवाडी रोड, ता. खटाव जि. सातारा) याच्यावर 406, 420, 409, 506, 504, 120 (ब), 34 (Cheating Case) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची व्याप्ती व स्वरुप मोठे असल्याने याचा तपास गुन्हे शाखा युनिट 2 कडे वर्ग करण्यात आला होता. पथकाने गुन्ह्याचा तपास करुन आरोपी डॉ. संजोग देशमुख याला सोमवारी (दि.11) अटक केली आहे. (Pune Crime News)

आरोपीला मंगळवारी (दि.12) न्यायालयात हजर केले असता त्याला 15 सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी मंजुर करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट -2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई (Senior PI Nandkumar Bidwai) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते (API Vishal Mohite) करीत आहेत.

ही कमगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल तांबे (ACP Sunil Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते, पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी, गणेश थोरात, विजय पवार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kothrud Ganesh Festival 2023 | कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे आयोजन ! दि. २४ सप्टेंबर रोजी होणार उद्घाटन

पुणे : सेवानिवृत्त अति वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याची दीड कोटींची फसवणूक, प्रचंड खळबळ

गणपती वर्गणीसाठी दुकानदाराला मारहाण करुन तोडफोड; लोणी स्टेशन येथील चौघांवर गुन्हा दाखल (Video)

कल्याणीनगर : सिक्रेट पोलीस असल्याचे सांगत चोरट्याने मोबाईल घेऊन ठोकली धुम

Smriti Irani | निराधार मुलांच्या संगोपनासाठी ‘तर्पण’ संस्थेबरोबर सामंजस्य करार; केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी

वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्याची करोडोची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे शाखेकडून एकाला अटक

पुण्यातील बुधवार पेठेत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची पुन्हा मोठी कारवाई ! अल्पवयीन मुलीसह 7 बांगलादेशी नागरिकांना पकडले (Video)