Pune Crime News | वाहनांमध्ये इंधन न भरता कॅश घेऊन पेट्रो कार्ड वर केली नोंद; रुग्णवाहिकेच्या चालकाने केली तब्बल १ लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भारती हॉस्पिटलमधील (Bharti Hospital) रुग्णावाहिकांमध्ये डिझेल भरण्यासाठी पेट्रो कार्डचा (Petro Card) वापर केला जातो. पण एका चालकाने रुग्णवाहिकेत (Ambulance) डिझेल न भरता पेट्रो कार्डवर मात्र डिझेल भरल्याची नोंद करुन पंपावरुन कॅश पैसे घेऊन तब्बल १ लाख १६ हजार रुपयांची फसवणूक (Cheating Case) केली. (Pune Crime News)

 

याबाबत प्रविण रघुनाथ जाधव (वय ४५, रा. आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी समीर प्रकाश साळवी (रा. प्रियदर्शनी अपार्टमेंट, बालाजीनगर, धनकवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार भारती हॉस्पिटलमध्ये १ एप्रिल २०२२ ते २ जानेवारी २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती हॉस्पिटलमध्ये ट्रान्सपोर्ट विभाग आहे. पेशंटला ने आण करण्यासाठी रुग्णवाहिका व इतर वाहनांना वेळोवेळी डिझेल व पेट्रोल भरण्यासाठी ते भारत पेट्रोलियमचे पेट्रो कार्ड वापरत असतात. पंपावर इंधन भरल्यानंतर त्यांचे बिल अदा केले जाते. ही ६ पेट्रो कार्ड कार्यालयात ठेवली जातात. इंधन भरण्यासाठी जाणारे चालक हे कार्ड घेऊन जातात व पेट्रोल, डिझेल भरुन झाल्यावर कार्ड पुन्हा आणून ठेवतात. ट्रान्सपोर्ट विभाग प्रमुख जयंत भेडसगावकर यांना २ जानेवारी ला एक कार्ड जागेवर आढळून आले नाही. ते कार्ड समीर साळवी याच्याकडे होते. त्याने ३१ डिसेबर व १ जानेवारी रोजी या कार्डवरुन प्रत्येकी ४ हजार रुपये काढलेले आढळले. त्यानंतर सर्व पेट्रो कार्डचे डेबिट तसेच रजिस्टर चेक केले असताना समीर साळवी याने वर्षभरात वेगवेगळ्या पेट्रो कार्डवरुन देशमुख पेट्रोल पंपावरुन इंधनाच्या ऐवजी रोख कॅश घेऊन १ लाख १६ हजार रुपयांचा अपहार केल्याचे आढळून आले. सहायक पोलीस निरीक्षक घावटे अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Enrollment on Petro Card by taking cash without
refueling vehicles; Ambulance driver cheated about 1 lakh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा