Pune Crime News | विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्याच्या निषेधार्थ बेकायदेशीर गर्दी करुन आर्वाच्य भाषेत घोषणा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह 60 ते 70 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल झालेल्याच्या निषेधार्थ बेकायदेशीर गर्दी करुन आर्वाच्य भाषेत घोषणा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या (NCP) पदाधिकाऱ्यासह 60 ते 70 जणांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bund Garden Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. शहरात 21 फेब्रुवारी ते 6 मार्च 2023 या कालावधीत बेकायदेशिर रित्या लोकांचा जमाव जमवून घोषणाबाजी करण्यास मनाई करण्यात आली असताना आरोपींनी मंगळवारी (दि.28 फेब्रुवारी) दुपारी पावणे बारा ते एक यावेळेत जिल्हाधिकारी कार्य़ालय येथे आर्वाच्य भाषेत घोषणाबाजी केली.

 

याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नवनाथ नामदेव डांगे Navnath Namdev Dange (वय-52) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी दयानंद इरकल Dayanand Irkal (रा. गोखले नागर, पुणे), पंकज पवार, शंकर डोंगरे, सुनिल मुंढे, गोट्या बदामी (सर्व रा. गोखलेनगर, पुणे) यांच्यासह 60 ते 70 जणांवर आयपीसी 188, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष शाखेचे (Special Branch) पोलीस उपायुक्त यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) येथे 21 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधीत बेकायदेशीर लोकांचा जमाव जमवणे तसेच आर्वाच्य भाषेत घोषणा देण्यास बंदी करण्यात आली आहे.
मात्र आरोपींनी राष्ट्रवादीचे पदाधिकार दयानंद इरकल यांच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station)
विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमून घोषणाबाजी केली.
त्यावेळी पोलिसांनी आरोपींना घोषणाबाजी न करण्याबाबत सूचना केल्या होत्या.
मात्र आरोपींनी याकडे दुर्लक्ष करुन शासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशाचा
अवमान केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | FIR filed against 60 to 70 people, including
NCP office-bearer, who staged an illegal rally to protest against a Molestation case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा