Pune Crime News | ‘मी इथला भाई आहे, त्या पोरांना गेटमधून आत का सोडलं?’ असं म्हणत दोन सुरक्षारक्षकांवर कोयत्याने वार; पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ‘तुम्हाला माहिती नाही का मी इथला भाई आहे. त्या पोरांना गेटमधून आत का सोडलं?’ असं म्हणत सुरक्षारक्षकांसोबत (Security Guards) वाद घालून त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेत दोन सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार (Pune Crime News) हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मते गेट खानापूर येथे घडली आहे.

 

गोविंद शिवाजी काकडे व ज्ञानेश भिमराव कांबळे असे जखमी झालेल्या दोन सुरक्षारक्षांची नावे आहेत. तर आकाश गणपत भिकुले (वय-27 रा. खानापूर, ता. हवेली) याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.28 फेब्रुवारी) रात्री आठच्या सुमारास घडला. (Pune Crime News)

 

आरोपी आकाश याची काही तरुणांसोबत वाद झाले होते. रात्री आठच्या सुमारास ते तरुण आनंदवन सोसायटीत आकाशच्या घरी आले होते. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाले. हे तरुण निघून गेल्यानंतर आकाश गेटवर आला. तुम्ही त्या पोरांना आतच का सोडले असे म्हणत सुरक्षारक्षकांसोबत वाद घातला. त्यावेळी आकाशने सोबत आणलेल्या कोयत्याने ज्ञानेश कांबळे यांच्या डोक्यात वार केला. त्यावेळी गोविंद काकडे हे मधे गेले असता त्यांच्याही पायावर वार केले.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सुरक्षारक्षकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर आकाश तेथून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमी सुरक्षारक्षकांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे (API Niranjan Ranware) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | murderer attack on security guard injured crime sinhgad pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Chinchwad Bypoll Election Results | 37 फेऱ्यांनतर ठरणार चिंचवडचा भावी ‘आमदार’, मतमोजणीला लागणार 14 तास

SSC Exam | ऑल द बेस्ट! उद्यापासून 10 वीची परीक्षा सुरु, राज्यात 15 लाख 77 हजार विद्यार्थी देणार परीक्षा

Ajit Pawar | ‘आशिष शेलारांच्या मताशी मी सहमत, त्यांना समज दिली पाहिजे’, संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितले