Pune Crime News | महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडेंना अटक, नोकरीच्या आमिषाने 44 जणांना गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | नोकरीच्या आमिषाने (Lure of Job) लाखो रुपयांची फसवणूक (Cheating) केल्या प्रकरणात शिक्षण विभागात (Education Department) मोठ्या पदावर असलेल्या शैलजा दराडे (Shailaja Darade) यांना अखेर पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. यापूर्वी शिक्षण विभागात पैशाच्या मोबदल्यात नोकरीचे आमिष दाखवल्याने दराडे याना निलंबित (Suspended) करण्यात आले होते. (Pune Crime News) त्यांनी राज्याच्या शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले होते. परंतु नोकरी न लावता फसवणूक केली. त्यावेळी शैलजा दराडे या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (Maharashtra State Examination Council) प्रभारी आयुक्त (Commissioner-in-Charge) होत्या.

पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) त्यांच्या विरोधात गुन्हा (FIR)दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. आता पुणे पोलिसांनी त्यांना अटक (Arrest) केली आहे. शैलजा दराडे आणि त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (Dadasaheb Ramchandra Darade) यांनी शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली होती. याबाबत पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रत्येकी 12 ते 15 लाख रुपये घेऊन 44 उमेदवारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले होते.

प्राथमिक चौकशीत शैलजा दराडे दोषी आढळल्यानंतर काही दिवसांपुर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं होतं.
त्यानंतर हडपसर पोलीसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांना उद्या (मंगळवार) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
शैलजा दराडेंच्या आधी शिक्षण परिषदेचे अध्यक्ष असलेले तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांनाही टी ई टी घोटाळ्यात
(TET Scam) अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षण परिषदेचा कारभार शैलजा दराडेंकडे सोपवण्यात आला होता.
मात्र शिक्षकांना नोकरी लावण्याच्या बहाण्याने दराडे यांनी लाखो रुपये प्रत्येकाकडून जमा केले होते.
ही रक्कम पाच कोटींच्या घरात होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | ‘अमित शहांनी अजित पवारांना विचारलं असेल, बाबा रे 70,000 कोटींचं व्याज….’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा टोला

Indrayani River Improvement Project | PMRDA: इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प! प्रदूषण नियंत्रणाचा पहिल्या टप्प्याला तत्वत: मंजूरी