Pune Crime News | ‘शादी डॉट कॉम’वर ओळख झाल्यानंतर शरीरसंबंध, सोन्याचे दागिने घेऊन पुण्यातील तरुणीची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ‘शादी डॉट कॉम’ या वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर तरुणीला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तिच्याकडून सोन्याचे दागिने घेऊन तिच्यासोबत शरीरसंबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. त्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक (Cheating Fraud Case) केली. या प्रकरणी एका तरुणावर खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. (Pune Crime News | )

लखन महादेव भिसे Lakhan Mahadev Bhise (रा. इंदापुर रोड, पिंपळी, ता. बारामती) याच्यावर आयपीसी 376/2, 377, 420, 406, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत टिळक रोड येथे राहणाऱ्या 25 वर्षाच्या तरुणीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै 2022 ते मार्च 2023 या कालावधीत पुण्यात घडला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर ओळख झाली. आरोपीने त्याचा खोटा बायोडाटा पाठवून तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवले. तिला पुण्यातील एका लॉजवर नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने वेगवेगळी कारणे सांगून तरुणीकडून रोख स्वरुपात पैसे व सोन्याचे दागिने घेऊन 8 लाख 3 हजार 738 रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर फिर्यादी तरुणीने आरोपीकडे लग्न करण्याची मागणी केली असता तो टाळाटाळ करू लागला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात संबंधित तरुणीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. खडक पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा (Rape Case) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘…तेव्हापासून हिंदुत्ववादी म्हणून घेण्याचा अधिकार
ठाकरेंना राहिला नाही’, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल (व्हिडिओ)

Pune Crime News | अश्लील चाळे करुन महिलेचा भररस्त्यात विनयभंग, मगरपट्टा परिसरातील घटना; दोघांना अटक

Eknath Khadse On Udayanraje Bhosale | ‘शरद पवारांनी मार्गदर्शक व्हावं’,
उदयनराजे यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर,’उदयनराजेंनी आधी…’

Mumbai Pune Expressway | महत्वाची बातमी! पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज एक तासांचा ब्लॉक

Ajit Pawar On Meera Borwankars Allegations | मीरा बोरवणकरांचे आरोप अजित पवारांनी फेटाळले, म्हणाले-‘जमिनींचा लिलाव करण्याचा अधिकार…’

अश्लील बोलून महिलेचा विनयभंग, पतीला पोलीस चौकी बाहेर धमकी देणाऱ्या दोन भावांवर FIR; वाघोली परिसरातील घटना