Pune Crime News | पैसे देत नसल्याने मित्रांनीच केले अपहरण; चौघांना अटक, खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | घेतलेले पैसे परत देत नसल्याच्या कारणावरुन मारहाण करुन पळवून नेणार्‍या चौघांना पोलिसांनी सापळा रचून तळेगाव दाभाडे येथे अटक केली. दिलेले पैसे वसुल करण्यासाठी अपहरण करण्याचा मार्ग अवलंबिलेल्या चौघांवर खंडणीचा गुन्हा (Extortion Case) दाखल केला आहे. (Pune Crime News)

दत्तात्रय ऊर्फ आबा श्रीराम वारिंगे, महेश ब्रम्हदेव जाधव (वय ३२), सुभाष गोपाळ सोनजारी (वय ३०) आणि रवी हनुमंत अंकुशी (वय ३४, सर्व रा. तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime News)

याबाबत असिफ हुसेन शेख (वय ३८, रा. मुंब्रा, ठाणे) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु़ रजि़ नं ४२/२३) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे दाजी परेवझ मोहमंद शेख ऊर्फ प्रविण शशिकांत कुलकर्णी (पाटील) (वय ४५, रा. लोहगाव) व आरोपी हे मित्र आहेत़ प्रविण याने आरोपी यांच्याकडून ८ लाख रुपये घेतले होते. तो ते परत देत नव्हता. त्यांचा फोनही घेत नव्हता. शेवटी ते चौघे जण त्याला शोधत पुण्यात आले. पुणे सोलापूर रोडवरील फातिमानगर येथी हॉटेल श्रीसागर येथे आरोपींना प्रविण याला बोलावले. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तो तेथे आला. त्याच्याकडे पैशांची मागणी केल्यावर त्याने टाळाटाळ केली. तेव्हा त्यांनी प्रविण याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे नेले. पैसे दिल्याशिवाय सोडणार नाही, असे सांगितले. त्याला डांबून ठेवल्याची माहिती त्याच्या घरच्यांना पहाटे ४ वाजता समजली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

प्रविण याच्या नातेवाईकांनी संपर्क साधल्यावर पैसे मिळाल्याशिवाय सोडणार नसल्याचे सांगितले.
त्याला लाकडी स्टीक, लोखंडी रॉडने मारहाण केली.
त्यानंतर पोलिसांच्या सांगण्यानुसार त्याच्या नातेवाईकाने साडेसात लाख रुपये देत असल्याचे सांगितले.
त्यानुसार ते पैसे घेण्यासाठी आले असताना चौघांना पकडून प्रविण कुलकर्णी याची सुटका करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Friends abducted for not paying; Four arrested, case of extortion registered

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MPSC Exam 2023 | मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत या वर्षी भरली जाणार “एवढी” पदे

Keshav Upadhye | भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांची फेरनियुक्ती

Pune Pimpri Crime News | घरभाडे थकवून घर मालकीणीला बेदम मारहाण करत केला विनयभंग, मोशीमधील धक्कादायक घटना