Pune Crime News | पुण्यातील कोंढव्यात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

पुणे : Pune Crime News | खिडकीतून खाली पडलेली वस्तू वर नेऊन देत असताना तिला घरात ओढून घेऊन एका सहावी-सातवीत शिकणार्‍या अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामुहिक बलात्कार (Pune Minor Girl Gang Rape Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार या पिडित मुलीने शिक्षकांना सांगितल्याने उघडकीस आला आहे. (Pune Crime News)

याबाबत एका १७ वर्षाच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. ५५५/२३) दिली आहे. हा प्रकार येवलेवाडीत २०१८ ते २०१९ दरम्यान घडला होता. (Pune Crime News)

फिर्यादी या ६ वी किंवा ७ वीमध्ये असताना घराशेजारील गल्लीत खेळत होत्या. त्यावेळी एका घराच्या खिडकीतून काही तरी वस्तू खाली पडली. फिर्यादी या ती वस्तू देण्यासाठी त्या घरात गेल्या. तेव्हा घरात असणार्‍या आरोपींनी तिला घरात ओढून घेतले. आतून कडी लावली. तिच्या रडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये, म्हणून मोठ्या आवाजात म्युझिक लावले (Crime Against Woman). तिचे कपडे काढून तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार (Pune Gang Rape) केला. त्यानंतर कोणाला काही सांगितले तर तुझे व तुझ्या घरच्यांचे खूप हाल करेल, अशी धमकी दिली. त्यामुळे आजवर तिने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. फिर्यादी यांनी त्यांचे स्कुल शिक्षकास हा प्रकार सांगितला. त्यानंतर हा प्रकार समोर आला असून पोलीस उपनिरीक्षक शेख (PSI Shaikh) तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Gang Rape On Minor Girl In Kondhwa Police Station Limits Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | दुर्दैवी ! सेवानिवृत्त झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच पुणे पोलीस दलातील हवालदाराचा मृत्यू

Pune School News | पुण्यातील नामवंत शाळेने फी भरली नाही म्हणून 150 विद्यार्थ्यांना काढलं बाहेर; पालक संतप्त

Sharad Pawar Meet CM Eknath Shinde | शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं भेटीचं कारण