Pune Crime News | पुण्यात गुंडांचा उच्छाद सुरुच, येरवडा परिसरात टोळक्यांमध्ये राडा; बिअरच्या बाटल्या घरावर फेकत, कोयते हवेत फिरवून पसरवली दहशत

0
459
Pune Crime News | gangwar between two gangs in pune beer bottles thrown at each other yerwada police station crime news
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील गुन्हेगारी वाढत चालली आहे. त्यातच कोयता गँगने (Koyta Gang) उच्छाद मांडला आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुर्ववैमन्यसातून येरवडा (Yerwada) येथे दोन टोळक्यांनी लक्ष्मीनगर भागात राडा घातला. या टोळक्याने तुफान दगडफेक करुन बिअरच्या बाटल्या (Beer bottles) घरावर आणि रस्त्यावर फेकल्या. टोळके एवढ्यावरच थांबले नाही तर हातात तलवारी आणि कोयते नाचवत दहशत निर्माण (Pune Crime News) केली. या टोळ्याने एकाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला अमीरउल्ला खान Abdullah Amirullah Khan (वय-19) असं कोयत्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. खान याने याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांविरोधात खुनाचा प्रयत्न करणे (Attempted Murder), बेकायदा हत्यारे बाळगणे, दहशत माजवणे अशा कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

शनिवारी रात्री फिर्यादी याचा मोबाईल फोन हरवल्याने मित्र महेश मिश्रा, आयुष यांना सोबत घेऊन येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) तक्रार देण्यासाठी गेले होते. तक्रार देऊन रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरुन घरी जात होते. त्यावेळी गजराज हेल्थ क्लब समोर ओळखीचे अंश पुंडे उर्फ आनशा, सुरेश कुडे उर्फ ममड्या, नाग्य आणि यश पात्रे उर्फ काळ्या यांनी फिर्यादीच्या दुचाकीचा पाठलाग केला.

 

त्यावेळी खान याची दुचाकी घसरल्याने तिघे खाली पडले. अल्पवयीन मुले त्यांच्याजवळ आले.
आनशा याने या कुत्र्याला आज सोडायचे नाही, असे म्हणत त्याच्या हातातील कोयत्याने खान याच्या डोक्यात दोन वार केले.
तर इतरांनी लाकडी दांडक्याने दोघांना बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत खान याने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या घटनेनंतर टोळक्याने हातातील तलवार आणि कोयते घेऊन परिसरात गोंधळ घातला.
खान याला मारहाण झाल्याचे समजताच दुसऱ्या टोळक्याने एकमेकांवर तुफान दगड फेक केली.
यावेळी घरांवर आणि रस्त्यावर दगडफेक आणि बिअरच्या बाटल्या फोडण्यात आल्या.
यामुळे परिसरातील नागरिक भयभीत होऊन घरात गेले. त्यांनी घाबरून घराच्या खिडक्या, दारे बंद केली.

 

सहा महिन्यापूर्वी आरोपी आणि फिर्य़ादी यांच्यात फुटबॉल खेळण्यावरुन वाद झाला होता.
त्यावेळी खान याला मारहाण केली होती. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गन्हे दाखल केले असून एकाला ताब्यात घेतले आहे.
तर इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | gangwar between two gangs in pune beer bottles thrown at each other yerwada police station crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | वरळीत आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश

Satyajit Tambe | ‘मी अपक्ष उमेदवार आहे, आणि अपक्षचं राहील..’ कुठलंही राजकीय भाष्य आजच्या तारखेला करणार नाही – सत्यजीत तांबे

Chitra Wagh | ‘मी कोणाचीच तुलना केली नाही’, ‘त्या’ वक्तव्यावरुन चित्रा वाघ यांची सारवासारव (व्हिडिओ)