Pune Crime News | खेड शिवापुर टोल नाक्यावर ट्रकसह 65 लाखांचा गुटखा जप्त, महामार्ग सुरक्षा पथक व राजगड पोलिसांची संयुक्त कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | महाराष्ट्रात बंदी असताना तस्करांकडून गुटख्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोमवारी (दि.11) महामार्ग सुरक्षा पथक (Highway Safety Squad) व राजगड पोलिसांनी (Rajgad Police) सोफा, टेबल, फ्रिज आदी घरगुती साहित्याची वाहतूक करत असल्याचे भासवून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करुन तब्बल 57 लाखांचा गुटखा जप्त (Gutkha seized) केला. या कारवाईत एकूण 65 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी ही कारवाई पुणे-सातारा महामार्गावर (Pune-Satara Highway) खेड शिवापूर टोलनाका (Village Sivapur Toll Plaza) येथे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता केली. (Pune Crime News)

याप्रकरणी इमरान अहमद अजमल खान Imran Ahmed Ajmal Khan (रा. कोळीवाडा रोड, वसई, ठाणे) व सुजित अग्रवाल (रा. पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर इमरान याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमधून सोफा, टेबल, फ्रिज आदी घरगुती साहित्याची वाहतूक करत असल्याचा बनाव करत गुटख्याची वाहतूक होत होती. याबाबतची माहिती महामार्ग सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार महामार्ग सुरक्षा पथक व राजगड पोलिसांनी खेड शिवापूर टोलनाक्यावर सापळा रचला. सातारा बाजूने येणारा ट्रक (एमएच 03 सीव्ही 3017) आडवला. (Pune Crime News)

ट्रक चालक इमरानकडे चौकशी केली असता त्याने एक्सपर्ट पॅकर्स अँड मुव्हर्स (Expert Packers and Movers), यशवंतपूर, बंगलोर, कर्नाटक कंपनी व ओंमकार रमेश सिरवी यांच्या नावाने असलेली बनावट पावती दाखवली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ट्रकची झडती घेतली. त्यावेळी 97 पोती, 4 बॅगा असा एकूण 57 लाख 12 हजार 800 रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला, तंबाखू, गुटखा आढळून आला. ट्रकमालकाच्या सांगण्यावरुन पुणे येथे सुजित अग्रवालला विक्रीकरिता हा मुद्देमाल जात असल्याची कबुली दिली. पोलिसांनी ट्रकसह 65 लाख 19 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना गुन्हे शाखेकडून 24 तासात अटक, साडेतीन लाखांचा ऐवज जप्त

कोंढवा परिसरात ‘भाईगिरी’ करणाऱ्या गणेश कोरडे याच्यासह इतर 2 जणांवर ‘मोक्का’!
पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 60 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

Maharashtra Pune ISIS Module Case | पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात NIA चा मोठा निर्णय,
चार वॉन्टेड गुन्हेगारांवर ठवले लोखोंचे बक्षिस