Pune Crime News | हडपसर पोलिस स्टेशन – बसची वाट पहात थांबलेल्यांना चौघांनी मारहाण करुन लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे -सोलापूर रोडवर (Pune-Solapur Road) बसची वाट पहात थांबलेल्यांना तिघांना मोटारसायकलवरुन आलेल्या चौघांनी मारहाण (Beating) करुन लुबाडले. (Pune Crime News)

 

याप्रकरणी योगेश मोहन घोलप (वय २९, रा. धानोरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९२७/२३) दिली आहे. हा प्रकार सोलापूर रोडवरील हडपसर येथील बजाज शोरुमच्या समोरील रोडवर शनिवारी पहाटे २ वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे दोन मित्र हे बजाज शोरुमसमोरील रोडवर बसची वाट पहात बसले होते. यावेळी एका दुचाकीवरुन तिघे तर दुसर्‍या दुचाकीवरुन एक जण असे चौघे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या हातावर धारदार हत्याराने जोरात फटका मारला. त्यांच्या हाताला दुखापत करुन फिर्यादी व त्यांच्या मित्रांना मारहाण करुन त्यांचे तीन मोबाईल व रोकड असा एकूण ५२ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक शिंदे (PSI Shinde) तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Hadapsar Police Station – Four people beat up and robbed
those who were waiting for the bus

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा