Pune Crime News | पुणे शहरातील सदाशिव पेठ, भोसले नगर परिसरात घरफोडी, 33 लाखांचा ऐवज लंपास

Pune Pimpri Chinchwad Crime News | A flurry of thieves in Pune, five houses in the society were broken into in one hour; Lumpas instead of lakhs

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये घरफोडी (House Burglary) गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. रविवारी (दि.26) पुणे शहरात दोन वेगळवेगळ्या पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यामध्ये चोरट्यांनी सोन्या चांदीसह डायमंडचे दागिने (Diamond Jewellery), रोख रक्कम असा एकूण 33 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. (Pune Crime News)

चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या (Chaturshringi Police Station) हद्दीमधील भोसले नगर येथे चोरट्यांनी जबरी चोरी केली आहे. अज्ञात चोरट्यांनी एका बंगल्यातून तब्बल 32 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. याप्रकरणी दीपक विलास जगताप (वय 52, रेंज हिल रोड, भोसले नगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.25) रात्री साडे दहा ते रविवारी (दि.26) दुपारी बाराच्या दरम्यान घडला आहे. चोरट्यांनी जगताप यांच्या घराच्या किचनचे खिडकीचे स्लाईडींग उघडून घरात प्रवेश केला. घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बेडरुम मधील दोन लॉकरमधील 100 ग्रॅम सोन्याचे दागिने (Gold Jewelry), रोख रक्कम, डायमंड व चांदिचे दागिने (Silver jewelry) असा एकूण 32 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील (API Patil) करीत आहेत. (Pune Crime News)

घरफोडीची दुसरी घटना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या (Vishrambag Police Station) हद्दीतील सदाशिव पेठेत घडली आहे.
चिमण्या गणपती चौकातील एक घरातून चोरट्यांनी 92 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.
याप्रकरणी मनोज भागवत सुतार (वय-32) यांनी तक्रार दिली आहे. मनोज भागवत व त्यांच्या पत्नी रविवारी (दि.26)
दुपारी तीनच्या सुमारास बाहेर गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने खिडकीच्या वरील पत्रा तोडून घरात प्रवेश केला.
कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले 5 ग्रॅम सोने, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 92 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
मनोज सुतार साडेतीनच्या सुमारास घरी आले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : ‘मोठ मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांना ओळखतो’ म्हणत महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, विनयभंग करणाऱ्या दोघांवर FIR

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना कोंढवा पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक, 4 महिन्यांपासून होते फरार

प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत, १२४ बांधकाम व्यावसायिकांना नोटीस

दोन एटीएम फोडले… हाती लागले केवळ 1900 रुपये; जुन्या सांगवीमधील घटना

विरुद्ध दिशेने येणाऱ्या मिनीबसची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी; चिंचवड येथील घटना

पिंपरी : साई चौकातील अवैध हुक्का बारवर पोलिसांचा छापा, 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

Total
0
Shares
Related Posts