Pune Pimpri Crime News | दोन एटीएम फोडले… हाती लागले केवळ 1900 रुपये; जुन्या सांगवीमधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | जुन्या सांगवी येथे एसबीआय बँकेचे (SBI Bank) दोन एटीएम चोरट्यांनी फोडले. मात्र, या दोन्ही एटीएम मधून चोरट्यांच्या हाती केवळ 1900 रुपये लागले. ही घटना शुक्रवारी (दि.24) दुपारी साडेबारा वाजता जुनी सांगवीतील महापालिकेच्या पाणी शुद्धीकरण केंद्रासमोरील राधानगर येथे घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Crime News)

याप्रकरणी बलभीम संपत जाधव (वय-40 रा. जाधववाडी, चिखली) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. रोहित विजय बहादुर सिंग Rohit Vijay Bahadur Singh (वय-23 रा. मु.पो. मोहम्मदपुर, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) व त्याचा अल्पवयीन साथीदार यांच्यावर आयपीसी 380, 427, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने दोन एटीएम मशिनचे कॅश शटर तोडले.
त्यानंतर आरोपींनी लोखंडी पट्टीच्या सहाय्याने मशीन मधील रोख रक्कम चोरली.
परंतु दोन्ही एटीएम मशिनमध्ये मिळून चोरट्यांच्या हाती केवळ 1900 रुपये लागले.
संशयितांनी एटीएमचे नुकसान करत रोख रक्कम चोरून नेल्या प्रकरणी बलभीम जाधव यांनी सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
पुढील तपास पोलीस नाईक गवारी करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ओबीसींची राजकीय ताकद मजबूत करण्याचे जानकरांचे भुजबळांना आवाहन, म्हणाले – ‘मुंडे आणि तुम्ही…’

विरुद्ध दिशेने येणाऱ्या मिनीबसची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी; चिंचवड येथील घटना