Pune Crime News | गणेशोत्सवात दोन लाख वर्गणी दिली नाही, मेट्रोच्या ठेकेदार कंपनीतील अधिकाऱ्याला फावड्याने मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे मेट्रो (Pune Metro) पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीतील (Contractor Company) अधिकाऱ्याने मंडळाची गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपयांची वर्गणी देण्यास नकार दिल्याने बांबू व फावड्याने बेदम मारहाण (Beating) करण्यात आल्याची घटना डेक्कन जिमखाना (Deccan Gymkhana) भागात घडली आहे. याप्रकरणी एकावर खंडणीचा (Extortion Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

शरद हरीभाऊ उगले Sharad Haribhau Ugle (वय-62 रा. सोमेश्वर वाडी रोड, पाषाण, पुणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी श्रीकांत संतोष मरळ याच्यावर आयपीसी 384, 324 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.30 नोव्हेंबर) घडला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगली महाराज रोड (Jangli Maharaj Road) लगत झेड ब्रीज येथील खाऊ गल्लीत
मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या पादचारी पुलाचे काँक्रीटचे काम सुरु आहे. या पुलाचे काम एका ठेकेदार कंपनीकडून केले
जात आहे. गणेश उत्सवात (Pune Ganeshotsav) मंडळाची गणेश मूर्ती घेण्यासाठी आरोपीने पुलाचे काम करणाऱ्या
अधिकाऱ्याकडे दोन लाख रुपये मागितले होते. मात्र त्यांनी पैसे दिले नाहीत. यामुळे चिडलेल्या मरळ याने फिर्यादी
यांच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना लाकडे दांडके असलेल्या फावड्याने मारहाण करुन जखमी केले.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निकुंभ (API Nikumbh) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Sharad Pawar | अजित पवारांनी सांगितला पक्षफुटीचा पडद्यामागील घटनाक्रम, शरद पवारांवर केला ‘हा’ आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहरात बनावट ‘पॅराशूट’ तेलाची विक्री, व्यवसायिकावर गुन्हा

Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा लढवण्याची अजित पवारांची घोषणा, आव्हानानंतर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

Pune Crime News | कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदलले, दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

ACB Trap News | एक लाखाची लाच घेताना ग्रामसेवक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police MPDA Action | लोणी काळभोर परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 63 वी स्थानबध्दतेची कारवाई