Pune Crime News : कोंढव्यात भाजी विक्रेत्याच्या गालावर चाकूने वार

पुणे (Pune Crime) : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime  दारू पिण्यास 200 रुपये न दिल्याच्या रागातून तरुणाने भाजी विक्रेत्याला शिवीगाळ करत चाकू सारख्या हत्याराने गालावर वार केल्याची घटना घडली. कोंढवा भागात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी रमजान हसन शेख (वय 34) यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार अन्सार आयुब खान (वय 30) याच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. बुधवारी ते भाजीच्या गाडीवर भाजी विक्री करत होते. त्यावेळी तोंड ओळख असलेला अन्सार खान त्यांच्याकडे आला. त्यांने दारू पिण्यास 200 रुपये मागितले. परंतु फिर्यादीने त्याला पैसे देण्यास नकार दिला. याचा राग त्याला आला. यानंतर आरोपीने चाकू सारख्या हत्याराने त्यांच्या गालावर वार केले. तसेच शिवीगाळ केली. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

कोंढवा परिसरात दोनच दिवसांपुर्वी काही गुन्हेगारांनी धुडगुस घातला होता.

तलवार दाखवुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न गुन्हेगारांनी केला होता.

त्याचा व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाला.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, कोंढवा परिसरात दिवसेंदिवस अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. भाजी विक्रेत्याकडे दारू पिण्यासाठी 200 रूपयांची मागणी करणे एक प्रकारे हप्ता वसुलीच करण्यासारखेच आहे. पोलिसांनी भाजी विक्रेत्याच्या गालावर चाकुने वार करणार्‍याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारांना वेळीच आवर घालण्यासाठी गुन्हेगार आणि समाजकंटकांवर कठोर कारवाईची आवश्यकता आहे.

Also Read This : 

 

Aurangabad News | औरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

 

शरीरातील ऑक्सिजन लेव्हल संतुलित ठेवण्यासाठी आहारामध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश; निश्चित होईल फायदा, जाणून घ्या

 

BCCI Big Announcement | इंग्लड दौऱ्यानंतर रंगणार आयपीएलचा थरार; बीसीसीआयने केली मोठी घोषणा

 

शॉम्पू केल्याच्या दुसर्‍याच दिवशी केस तेलकट होतात? ‘हे’ घरगुती उपाय येतील तुमच्या कामाला, जाणून घ्या

 

Congress Leader Sachin Pilot : भाजपवासी झालेल्या ‘या’ महिला नेत्याचा मोठा दावा, म्हणाल्या – ‘सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील’

 

उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी घरच्या घरीच बनवा फेस मास्क, स्किन राहील फ्रेश अन् ग्लोईंग, जाणून घ्या

 

मुलांच्या उपचाराची गाईडलाईन जारी, होणारनाही रेमडिसिविरचा वापर