Pune Crime News | खळबळजनक ! तुला संपवतोच म्हणत पुणे मनसेच्या जिल्हाध्यक्षावर कुटुंबासमोरच गोळीबार, राजगुरुनगर मधील घटना

0
903
Pune Crime News | in rajgurunagar firing on mns district president sameer thigale in pune crime news
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्याचे मनसे (Pune MNS) जिल्हाध्यक्ष समीर थिगळे (Sameer Thigale) यांच्यावर गोळीबार (Firing) करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. राजगुरुनगरच्या (Rajgurunagar) सातकरस्थळ (Satkarsthal) येथील राहत्या घरासमोर हा प्रकार घडला आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या कुटुंबासमोरच त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी (Pune Crime News) दाखल झाला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. दरम्यान, मनसेच्या शहराध्यक्षावर गोळीबार झाल्याने शहरात दहशतीचे वातावण निर्माण झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, समीर थिगळे हे आपल्या राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील घरासमोर असताना आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत होते. मी खेडचा भाई आहे, एकाला घालवलाय, तुलाही माज आला आहे. तुला ही संपवतोच असं म्हणत पिस्टल रोखून थिगळे यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार झाला त्यावेळी त्यांचे कुटुंब समोर होते.

 

हल्लेखोरांनी समीर थिगळे यांच्या छातीवर गोळी झाडली. मात्र सुदैवाने पिस्तुलातून गोळी सुटली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करुन थिगळे यांना धमकावून घटनास्थळावरुन पळून गेले. या घटनेमुळे थिगळे कुटुंबीय हादरुन गेले आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

हल्लेखोर हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मोक्का (MCOCA) Mokka आणि खुनासारखे (Murder)
गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.
आरोपींकडून खंडणीची (Extortion) मागणी करत पिस्तुल रोखत फायरिंग केले.
या घटनेनंतर राजगुरुनगर पोलिसांनी मिलिंद जगदाळे आणि मयुर जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | in rajgurunagar firing on mns district president sameer thigale in pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा