Pune Crime News | अज्ञात 3 तरुणांकडून एकावर कोयत्याने वार, टिळक रोडवरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यात कोयता गँगची (Koyta Gang) दहशत अद्याप कमी झालेली नाही. किरकोळ कारणावरुन कोयत्याने वार केल्याच्या घटना शहराच्या विविध भागात घडत आहेत. टिळक रोडवर एका तरुणावर तीन अज्ञात तरुणांनी कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.10) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास टिळक रोडवरील शक्ती स्पोर्टस दुकानासमोर घडली आहे. (Pune Crime News)

याबाबत अक्षय मलाप्पा शिंगे (वय-25 रा. महात्मा फुले वसाहत, पर्वती) याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambag Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी अदाजे 20 ते 22 वर्षाच्या तीन अनोळखी तरुणांवर आयपीसी 307, 504 आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय शिंगे हा त्याचे मित्र करण दिवार व मुज्जमीर शेख यांच्यासोबत ड्रेस अल्टर करण्यासाठी गेला होता. ड्रेस अल्टर करुन दुकानातून बाहेर आला असता एसपी कॉलेज कडून तीन अनोळखी तरुण आले. त्यापैकी एकाने कंबरेला लावलेला लोखंडी कोयता काढून
अक्षय याच्या हातावर व पायावर वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नानेकर (API Nanekar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

‘तु मोठा भाई झाला का, तुझा गेमच करतो’ म्हणत दोघांना मारहाण, माळवाडी परिसरातील घटना; 4 जणांना अटक

पुणे : अल्पवयीन मुलाकडून 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न