Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडकी पोलिस स्टेशन – बनावट नंबरप्लेट रिक्षाला लावून फिरणार्या चालकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मुळची रिक्षा निरा येथे असताना त्या रिक्षाची नंबर प्लेट लावून ती रिक्षा पुणे शहरात (Pune City) राजरोसपणे फिरत होती. वाहतूक शाखेने या रिक्षावर ई चलान फाडले. ते चलन मुळ रिक्षामालकाला पाठविले. त्यातून पुण्यात बनावट नंबर प्लेट (Fake Number Plate) लावून रिक्षा फिरत असल्याचे आढळून आले आहे. (Pune Crime News)
श्रीकांत मोहन वेळेकर Shrikant Mohan Velekar (वय ३६, रा. महात्मा गांधी वसाहत, शिवाजीनगर – Mahatma Gandhi Colony, Shivajinagar) याला अटक केली आहे. याबाबत राजेंद्र चंद्रकांत बोराटे (वय ५०, रा. निरा) यांनी खडकी पोलीस स्टेशनमध्ये (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६१/२३) दिली आहे. फिर्यादी हे निरा परिसरात रिक्षा व्यवसाय करतात. श्रीकांत वेळेकर याने रिक्षेवर बनावट नंबरप्लेट लावून व्यवसाय सुरु केला. २१ मे रोजी सकाळी अकरा वाजता तो खडकीतील पोल्ट्री चौकात (Poultry Chowk Khadki) आला होता.
त्यावेळी त्याच्याकडे लायसन्स नव्हते तसेच विना गणवेश तो रिक्षा चालवत होता, म्हणून वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) त्यांच्या नंबरप्लेटवरुन त्याच्यावर ई चलनाचा १ हजार रुपयांचा दंड केला. त्याचा मेसेज फिर्यादी यांना गेला. तो पाहून ते आश्चर्यचकीत झाले. त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी श्रीकांत वेळेकर याचा शोध घेऊन अटक केली. पोलीस उपनिरीक्षक मगदुम तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Khadki Police Station – Arrested the driver of the rickshaw with fake number plate
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – सराईत गुंडाच्या टोळक्याने
दारू दुकानावर घातला दरोडा; दारुच्या बाटल्यासह नुकसान करुन गल्ल्यातील रोकड चोरली - Shivdi-Nhava Sheva Sea Link | मुख्यमंत्री शिंदेंची संधी हुकली ‘स्टेअरिंग’ पुन्हा फडणवीसांच्या हाती (व्हिडिओ)
- Pune Fire News | टिंबर मार्केटमध्ये लाकडाच्या गोदामाला भीषण आग; पाच तासानंतरही आग भडकलेलीच :
१० सिलेंडर बाहेर काढल्याने आणखी मोठा अनर्थ टळला