Pune Crime News | कोंढवा: एक कोटी कर्ज देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक, महिलेवर कोंढवा पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | एक कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा बहाणा (Lure Of Bank Loan) करून एका महिलेची एक लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Case) करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पानमळा, सिंहगड रोड (Panmala Sinhagad Road) येथील 48 वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार उमा माणिक पाल Uma Manik Pal (रा. महंमदवाडी रोड, हडपसर) हिच्यावर आयपीसी 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार सप्टेंबर 2020 ते गुरुवार (दि.14) या कालावधीत मोहंमदवाडी रोड, हडपसर (Mohamadwadi Road Pune) येथे घडला आहे. आरोपी महिलेने फिर्यादी यांना एक कोटी रुपयांचे लोन करुन देते असे सांगितले. लोन मंजूर करण्यासाठी आरोपीने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी दोन लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर लोन मंजुर केले नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी दोन लाख रुपये परत मागिते असता एक लाख रुपये परत केले. मात्र अद्याप पर्यंत उर्वरित एक लाख रुपये परत न करता आर्थिक फसवणूक केली. तक्रार अर्जाची चौकशी करुन कोंढवा पोलिसांनी फसवणुकीचा (Fraud Case) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Pune Cheating Fraud Case)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai High Court | “पत्नीने माहेरच्यांसोबत संपर्कात राहु नये अशी अपेक्षा ही मानसिक क्रूरता”
मुंबई हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरिक्षण

Pune Crime News | क्रेडिट कार्डची केवायसी करण्याच्या बहाण्याने पुण्यातील तरुणाची ऑनलाईन फसवणूक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारणाऱ्या वडिलांना बेदम मारहाण; नाना पेठेतील घटना