Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – मी टिपू पठाणचा नंबरकारी ! तरूणावर चाकूने वार

पुणे : Pune Crime News | मारहाण होणार्‍या तरुणाच्या विनवणीवरुन त्याने विचारणा केल्याच्या कारणावरुन गुंडाने मी टिपू पठाणचा (Tipu Pathan) नंबरकारी आहे. मला हडपसरचा (Hadapsar) भाई संतोष इसावे (Santosh Esave) म्हणतात, असे म्हणून त्याने दोघांवर चाकूने वार करुन जखमी केले. (Pune Crime News)

याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी संतोष बाजीराव इसावे Santosh Bajirao Esave (रा. हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत निखील सुदाम विरकर (वय २३, रा. लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३०९/२३) दिली आहे. हा प्रकार लोणी काळभोरमधील राजेंद्र पेट्रोल पंपाजवळ १ मे रोजी पहाटे अडीच वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र कान्हा काळभोर हे पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेले होते. त्यावेळी बोलत असताना गणेश काळभोर हा तेथे पळत आला. आरोपी त्याला मारहाण करीत असल्याचे सांगून मला वाचवा, असे तो म्हणाला. कान्हा याने त्याला तुम्ही गणेशला का मारहाण करीत आहे, अशी विचारणा केल्यावर त्याने तुला आमचे काय करायचे आहे़ तू आमच्यामध्ये पडू नको, नाही तर तुलासुद्धा सोडणार नाही़ अशी धमकी दिली. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला तुम्ही त्याला मारु नका, आम्ही त्याला घरी सोडतो, असे सांगितले. त्याचा राग येऊन त्याने  व त्याच्या सोन्या साथीदाराने फिर्यादीला मारहाण करायला सुरुवात केली.

कान्हा हा मदतीला आल्यावर त्याने लय माज आला आहे. मी टिपू पठाणचा नंबरकारी आहे.
मला हडपसरचा भाई संतोष विसावे म्हणतात, अशी धमकी देऊन त्याने साथीदार सोन्या याला यांना सोडायचे नाही,
असे म्हणून जॅकेटमधून चाकू काढून फिर्यादी व कान्हा यांच्या गालावर, डाव्या बाजूला,
गळ्यावर वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर ते दोघे पळून गेले. दोघांना १०८ रुग्णवाहिकेतून
शिवम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. फिर्यादी हे सोमवारपर्यंत उपचार घेत होते.
त्यानंतर ते घाबरल्याने यवत येथील नातेवाईकांकडे गेला होता. कान्हा याला डॉक्टरांनी आराम करण्यास व जास्त
न बोलण्याचा सल्ला दिल्याने तो तक्रार देण्यास गेला नाही. भिती कमी झाल्याने मंगळवारी फिर्यादीने तक्रार
दिली असून पोलीस उपनिरीक्षक मोरे (PSI More) तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Loni Kalbhor Police Station – I’m Tipu Pathan’s gang member ! A young man was stabbed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitesh Rane On Sanjay Raut | संजय राऊत सर्वात मोठा लँड माफिया, धमकी देऊन जमीन विकत घेतली; भाजप आमदार नितेश राणेंचा गंभीर आरोप (व्हिडिओ)

Mumbai Metro Line 3 | मेट्रो-3 चा आरे ते बीकेसी स्थानकादरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : फरासखाना पोलिस स्टेशन – बुधवार पेठेत गंमत म्हणून आले अन् तिघांनी त्यांना मारहाण करून लुटले