Pune Crime News | लग्नासाठी दबाव टाकून अल्पवयीन मुलीचा मानसिक छळ, तरुणावर गुन्हा; हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा (Minor Girl) पाठलाग करुन तिला व्हडिओ कॉल करण्यास भाग पाडून लग्नासाठी दबाव टाकून मानसिक छळ केला. याप्रकरणी 25 वर्षीय तरुणावर विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2023 ते सोमवार (दि.4) रात्री साडेसात च्या दरम्यान गाडीतळ, हडपसर येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत हडपसर परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी समाधान धोत्रे (वय-25 रा. गाडीतळ, हडपसर) याच्यावर आयपीसी 354, 354अ, 354ड, 506 सह पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलीच्या घरात भाडेकरु आहे.
त्याने मुलीचा पाठलाग करुन तिच्यासोबत जबरदस्तीने चॅटींग करुन व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडले.
यानंतर आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील लग्न करण्याची मागणी करत तिच्यावर
दाबाव आणून तिचा मानसिक छळ केला. तसेच मैत्रिणी समोर जबरदस्तीने हात पकडून लग्नाची करण्याची मागणी
करुन विनयभंग (Molestation) केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुतण्याकडून पाऊण कोटींची फसवणूक, पुण्यातील प्रकार

पुण्यातील वाकडा पुल येथील खुनाच्या प्रयत्नातील चार आरोपींची निर्दोष मुक्तता

Sanjay Raut | इंडिया आघाडीची उद्या दिल्लीत बैठक, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार, ‘हे’ नेते नाराज, संजय राऊतांनी दिली माहिती