Pune Crime News | कोंढवा: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, कोंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पहिल्या पतीपासून घटस्फोट घेण्यास सांगून महिलेला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) बलात्कार केल्याची (Rape In Pune) घटना कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल (Kondhwa Police Station) करण्यात आला आहे. हा प्रकार 26 जानेवारी 2023 ते 6 ऑगस्ट 2023 दरम्यान खराडी येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत हिंजवडी येथे राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सुमेध संतोष फुलझेले (रा. चंद्रपुर) याच्यावर आयपीसी 376, 376(2)(एन), 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ने पीडित महिलेला तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेण्यास सांगून लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपीने पीडित महिलेला खराडी परिसरात नेऊन तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ काढला. महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

INDIA Alliance Main Bhi Gandhi Rally In Mumbai | ‘इंडिया’च्या ‘मी पण गांधी’ पदयात्रेला गालबोट,
मुंबईत कार्यकर्ते-पोलिसांत वादंग?

Pune Pimpri Chinchwad Crime News | चार सराईत गुन्हेगारांकडून 5 पिस्टल 10 काडतुसे जप्त,
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची कारवाई (Video)

Nanded Government Hospital | धक्कादायक! नांदेडमध्ये वेळेत औषधे न मिळाल्याने 24 तासांत 24 रुग्ण दगावले