Pune Crime News | धकनवडी-बालाजीनगरमध्ये टोळक्याकडून युवकावर खुनी हल्ला, करण पाटील आणि विवेक चोरगेला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जुनी भांडणे मिटवण्याच्या कारणावरून वाद करून युवकावर टोळक्याने खुनी हल्ला (Attempt To Murder) केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास काशिनाथ पाटील नगर (Kashinath Patil Nagar)- बालाजी नगर (Balaji Nagar Dhankawadi) येथील अ‍ॅक्सीस बँकेच्या पाठीमागे घडली. टोळक्याकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (Pune Crime News)

 

करण श्रीनिवास पाटील Karan Shriniwas Patil (20, रा. धनश्री अपार्टमेंट समोरील बिल्डींग, दुसरा मजला, बालाजी नगर, धनकवडी) आणि विवेक बाबुराव चोरगे Vivek Baburao Chorge (24, रा. सर्व्हे नं. 23/02, बालाजीनगर धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात आकाश रामलाल रजक (24, रा. झांबरे बिल्डींग, शॉप नं. 2, काशिनाथ पाटील नगर, बालाजीनगर) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश यांचा भाऊ अभिषेक याला त्याच्या ओळखीचा विवेक चोरगे याने फोन करून ठाकुर पान शॉप येथे शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बोलावुन घेतले. आरोपी करण पाटील आणि त्याच्या इतर मित्रांसोबत असलेल्या जुन्या भांडणाचा राग मनात ठेवुन आरोपींनी अभिषेकला मारहाण करण्यास सुरूवात केली. अभिषेक त्यांच्या तावडीतुन सुटुन घरी पळत जात होता. त्यावेळी आरोपी करण पाटीलने त्यास रस्त्यामध्ये पकडले. आज याला खल्लास करून टाकायचा जिवंत सोडायचे नाही असे म्हणून धारदार हत्याराने अभिषेक याच्यावर वार केला. जखमी झालेल्या अभिषेकने आरडा-ओरडा केल्यानंतर गल्लीतील लोक तेथे जमा झाला. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या हातातील धारदार हत्यारे उंचावत गल्लीतील लोकांना तुम्ही त्याला मदत केली किंवा मध्ये आला तर तुम्हाला एकेकाला मारून टाकीन असे मोठ-मोठयाने ओरडून दहशत निर्माण केली.

 

पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपी करण पाटील आणि विवेक चोरगे यांना अटक केली आहे. गुन्हयाचा तुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बेरड करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Murderous attack on youth by gang in
Dhaknawadi-Balajinagar, Karan Patil and Vivek Chorge arrested by sahakarnagar police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा