धक्कादायक ! महाविद्यालयीन युवती दान करण्यास गेली खरी, तृतीय पंथीयांनी 50 हजाराची अंगठी जबरदस्तीनं चोरली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाविद्यालयीन विद्यार्थीनीने दान म्हणून पैसे देत असताना तृतीय पथियांनी तिच्या बोटांमधील 50 हजार रुपयांची अंगठी जबरदस्तीने नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सेना पती बापट रस्त्यावर हा प्रकार आज दुपारी घडला आहे.

याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तृतीय पथीला अटक करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद तरूणी एका नामांकित महाविद्यालयात मिडिया कम्युनिकेशनचे शिक्षण घेते. ते येथे नातेवाईकांकडे राहेत. दरम्यान, आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास चतुश्रृंगी मंदिरात दर्शनासाठी आली होती. दर्शन घेऊन जात असताना तिला रस्त्यावर तृतीय पंथी दिसले. त्यामुळे दान म्हणून तिने त्यांना 50 रुपये दिले. परंतु, त्यांनी आणखी पैसे दे तुला दुवा लागेल असे सांगितले. तसेच, तिच्या हातातील पर्स काढून घेतली. त्यातील पैसेही घेतले. तरीही तरुणी त्यांना काही बोलली नाही. मात्र, यानंतर तृतीय पथ्यांनी तिला बोटांमधील अंगठी काढून दे असे सांगितले. यावेळी तिने आजींने दिलेली अंगठी असून, ती घेऊन का असे सांगितले. परंतु, तरीही एका तृतीय पंथिय अंगठी घेऊन निघून गेली. यावेळी तरूणीने घाबरून वडिलांना फोन केला. तसेच, त्यांना माहिती दिली. त्यांनी पोलिसांना फोन करण्यास सांगितले. यानंतर येथील रिक्षा चालकांनी शंभर क्रमांकावर फोन केला. यानंतर चतुश्रृंगी पोलीसांनी येथे धाव घेतली. चौकशी केल्यानंतर तृतीय पंथी पसार झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर तपास पथकातील विशाल साबळे व अजय गायकवाड यांनी हडपसर परिसरातून तिला ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हा दाखलकरून अटक करण्यात आली. अधिक तपास चतुश्रृंगी पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/