Pune Crime News | पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील दुमजली घराचे छत कोसळून एकाचा मृत्यू तर एकजण जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या Pune Cantonment Board (PCB) हद्दीतील एका दुमजली घराचे छत कोसळून एकाचा मृत्यू झाला तर एका महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी (दि.26) रात्री पावणे नऊच्या सुमारास पुणे कॅम्पातील (Pune Camp) दस्तुर मेहेर रोडवर घडली. (Pune Crime News) घटनेची माहिती मिळताच पोलीस (Pune Police) आणि कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाच्या (Pune Cantonment Fire Brigade) जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

स्टॅनली डिसोझा Stanley D’Souza (वय-50) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर जेरी डिसोझा Jerry D’Souza (वय-60) हे जखमी झाले असून त्यांना ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Pune Crime News)

अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,
रात्री पावणे नऊच्या सुमारास नियंत्रण कक्षाला दुमजली घराचे छत कोसळल्याची माहिती मिळाली.
कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
ही इमारात खूप जुनी असून वरच्या घराचे छत खालच्या घरात कोसळले.
बांधकाम 50 वर्षे जुने असल्याने वरचा भाग देखील कोसळण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी याठिकाणी बॅरेकेटींग केले आहे.

 

 

Web Title :  Pune Crime News | One dead and one injured after the roof of a house collapsed in Pune Cantonment Board area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा