Pune Crime News | पुणे रेल्वे स्टेशनवर भर दिवसा प्रवाशाला लुटले; दोघा सराईत गुंडांना अटक

पुणे : Pune Crime News | पुणे स्टेशनवर (Pune Railway Station) भर दिवसा प्रवाशाचा गळा पकडून त्याला लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी (Pune Police) दोघा सराईत गुंडांना (Criminal On Pune Police Records) अटक केली आहे. (Pune Crime News)

याबाबत इरफान खाजा खलिफ (वय २५, रा. रायचूर, कर्नाटक) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे (Bundgarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३०४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अक्षय विजय सूर्यवंशी Akshay Vijay Suryavanshi (वय २५, रा. वाघोली) आणि अब्दुल रहमान अबुजर तामटगार Abdul Rahman Abujar Tamtgar (वय २९, रा. अप्पर डेपो, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेरील रिक्षा स्टँडजवळ शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गावावरुन पुणे रेल्वे स्टेशनला आले होते. ते स्टेशनमधून बाहेर पडून रिक्षा स्टँडजवळ बसले होते. यावेळी हे दोघे गुंड त्यांच्याजवळ आले. त्यांना हिंदीतून “तुम्हारे पास पैसे कितना पैसा है, पैसा निकाल,” असे म्हणून एकाने हाताने गळा पकडून “पैसा देता क्या, नही तो मार दु क्या” असे बोलून त्यांच्या पँटच्या खिशातून दीड हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन पळून जाऊ लागले. फिर्यादी यांनी आरडा ओरडा करता तेथे गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दोघांना पकडले. पोलीस उपनिरीक्षक गावडे (PSI Gawde) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | धक्का लागल्याच्या रागातून दगड मारुन केले गंभीर जखमी

पुण्यातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 45 वी स्थानबध्दतेची कारवाई

पुण्यातील ससून हॉस्पीटलच्या गेटवर अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त; कोटयावधीचं एमडी जप्त, प्रचंड खळबळ

माझ्याकडे बघुन थुंकला का म्हणत तरुणाच्या गळ्यावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न