Pune Crime News | स्वतःच्या स्टेटसला भावपूर्ण श्रध्दांजली ठेवत युवकाने रेल्वेखाली येऊन संपवले जीवन

दौंड : Pune Crime News | तरुणाईमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. त्याच दौंड तालुक्यातील पारगाव (Pargaon Daund) येथील एका युवकाने स्वताच्या स्टेटसला भावपूर्ण श्रध्दांजली असे स्टेटस ठेवत केडगाव (Kedgaon) परिसरात रेल्वे खाली जाऊन आत्महत्या (Suicide In Pune) केली आहे. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Pune Crime News)

आदित्य ओव्हाळ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या आत्महत्येने पारगाव शोककळा पसरली आहे. आदित्य ओव्हाळ हा दौंड तालुक्यातील एका मोठ्या शेतकरी कुटुंबातला मुलगा होता. तसेच त्याचा पारगाव येथे मेडिकलचा व्यवसाय देखील होता. आदिमनी मेडिकल नावाने तो प्रचीलित होता. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, दौंड तालुक्यातील पारगाव येथे आदित्य याचे मेडिकलचे दुकान आहे. तो एका मोठ्या शेतकरी कुटुंबातील मुलगा होता. आई वडिलांना एकुलता एक असल्याने आई वडिलांनी लाडात त्याला वाढवले होते. काही महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न देखील झाले होते. मात्र असे काय झाले की त्याने एकदम एवढे टोकाचा निर्णय घेऊन आपले जीवन संपवले. (Daund Crime News)

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या स्वतःच्या स्टेट्सला स्वतःचे जवळपास ११ फोटो ठेवले होते.
त्याती शेवटचा फोटोला भावपूर्ण श्रद्धांजली असा ठेवला आणि त्याने धावत्या रेल्वे खाली येऊन जीव दिला.
त्याच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली असून एकुलता एक मुलगा गेल्याने आई वडील आणि पत्नी
धक्क्यात आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी कोणतेही कारण घटनास्थळावरून सापडले नाही.
या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Web Title :  Pune Crime News | Paying emotional tribute to his status, the young man ended his life by falling under the train

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील कांदा व्यापार्‍याला 46 लाखांचा गंडा; परदेशात निर्यात करण्याच्या नावाखाली फसवणूक

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | सहा महिने झाले सरकारची नुसतीच घोषणा;
खेळाडूंचा गौरव ही नाही आणि पुरस्काराची रक्कम सुध्दा नाही

Vanita Kharat | रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम ‘ही’ अभिनेत्री झळकणार; ट्रेलर मध्ये दिसली झलक