Pune Crime News | अपघाताच्या बहाण्याने लुटमार करणाऱ्या इरफान सैय्यद व त्याच्या तीन सदस्यांवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 7 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | रस्त्यात अपघात झाल्याचा बहाणा करुन लुटणाऱ्या इरफान इस्माईल सैय्यद (Irfan Ismail Syed) याच्यासह तीन साथिदारांवर मोक्का अंतर्गत (MCOCA Action) Mokka कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांची आजपर्यंतची ही सातवी कारवाई आहे. (Pune Crime News)

 

टोळी प्रमुख इरफान इस्माईल सैय्यद (वय-30 रा. साडेसतरा नळी, माळवाडी,हडपसर), शरद उर्फ डॅनी रावसाहेब अहिरे (वय-26 रा. चांदे रोड, पुणे), शंक औदुंबर पकाले (वय-27 रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) आणि एका महिलेवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime News)

10 डिसेंबर 2022 रोजी फिर्यादी हे रात्री कामावरुन घरी जात होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या दोन दुचाकी गाडीवरील तीन अनोळखी व्यक्तींनी व त्यांच्या एका महिला साथीदार यांनी फिर्यादी यांना आडवले. तुझ्याकडून मागे दोन अपघात (Accident) झाले आहेत. त्या अपघाताचा जो काय 40 हजार रुपये खर्च असेल तो द्यायचा नाहीतर तुझा हात उपसुन काढुन आयुष्य उध्वस्त करु, तू प्रॉपर पुण्याचा दिसत नाही अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी यांना जबरदस्तीने मित्राकडून फोन-पे वरुन पैसे घेण्यास लावले. ते पैसे बँकेच्या एटीएममधून जबरदस्तीने काढून घेतले. आरोपींनी 20 हजार रुपये रोख व फोन पे वर 20 हजार असे एकूण 40 हजार रुपये घेऊन बेदम मारहाण केली. याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) आयपीसी 394, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

या गुन्ह्याचा तपास करत असताना इरफान सैय्यद आणि त्याच्या साथिदारांनी पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे केले असून विविध पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी जबरी चोरी, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यांच्यात काहीही सुधारणा झाली नाही. आरोपींनी पुन्हा अशा स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.

दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan) यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ -3 सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांना सादर केला होता. अपर पोलीस आयुक्तांनी कागदपत्रांची पडताळणी करुन आरोपींवर मोक्का कारवाईचे आदेश दिले. पुढील तपास सिंहगड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) करीत आहेत.

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सहेल शर्मा,
सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन,
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे (Police Inspector Vijay Khomene),
तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, दयानंद तेलंगे पाटील, किशोर वळे,
सद्दाम शेख, प्रशांत शिंदे, अमित सुर्वे, अनिस तांबोळी, नवनाथ भोसले, अमोल दबडे,
अमित चिव्हे, गुन्ला, दिपक लोधा, महेश चौगले, अक्षय खन्ना यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Police Commissioner Ritesh Kumar’s 7th MCOCA Mokka
action against Irfan Syed and his three members who robbed on the pretext of an accident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा