Pune Crime News | पुणे : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार, अल्पवयीन मुलगा ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने (Koyta) वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना फुरसुंगी येथे घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.6) दुपारी एकच्या सुमारास धनगरवाडा हॉटेल, फुरसुंगी येथे घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल करुन एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News)

याबाबत शहाबुद्दीन कमरुद्दीन शेख (वय-19 रा. ढमाळ वस्ती, फुरसुंगी, पुणे) याने हडपसर पोलीस ठाण्यात
(Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर आयपीसी 326 व आर्म
अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याचा मित्र आदित्य मगर
व आरोपी यांच्यात भांडण सुरु होते. हे भांडण सोडवण्यासाठी शेख त्याठिकाणी गेला. शेख याने दोघांना ‘तुम्हाला अजुन भांडण करायचे आहे का?’ असे म्हटले. याचा राग आल्याने अल्पवयीन मुलाने कंबरेला लावलेला कोयता काढला. (Pune Crime News)

त्यावेळी शेख हा घबरुन त्या ठिकाणावरुन पळून गेला. आरोपीने त्याचा पाठलाग केला. त्यावेळी जीव वाचवण्यासाठी
शेख एका दुकानात लपला असता अल्पवयीन मुलाने दुकानात जाऊन शेख याच्यावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case News | 5 हजाराच्या लाच प्रकरणी पुरंदर तालुक्यातील तलाठी अन् पंटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | आई व मुलीला जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण, खडकीतील प्रकार; एकाला अटक

Ananya Panday Airport Look | अनन्या पांडेच्या कॅज्युअल एअरपोर्ट लूकनं चाहत्यांच वेधलं हृदय…!